अकोला दिव्य समाज : माहेश्वरी समाजातील होतकरू तरुणांच्या विकासासाठी विविध योजना आणि उपक्रम राबविणारे विदर्भ प्रादेशिक युवा संघटनेकडून संपूर्ण महाराष्ट्रातील समाजबांधवांच्या घरात निःशुल्क वाटप करण्यात येणाऱ्या दिनदर्शिका २०२५ चे प्रकाशन नागपुर येथे आध्यात्मिक गुरु पंडित विजयशंकर मेहता यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रादेशिक युवा संघटन संस्थापक अध्यक्ष श्यामसुंदर सोनी, अखिल भारतीय माहेश्वरी महासभा सभापती संदीप काबरा,
महामंत्री अजय काबरा, अर्थमंत्री व निवर्तमान राष्ट्रीय युवा अध्यक्ष कुमार काल्या, संयुक्त मंत्री दिनेश राठी, राष्ट्रीय युवा संघटनेचे अध्यक्ष शरद सोनी, महामंत्री प्रदीप लढ्ढा , विदर्भ प्रदेश सभा अध्यक्ष सीए दामोदर सारडा तसेच विदर्भ प्रादेशिक माहेश्वरी संघटनेचे सारथी अभियानचे संयोजक प्रा.रमण हेडा, अखिल भारतवर्षीय माहेश्वरी महासभा, अखिल भारतीय युवा संघटनेचे प्रमुख पदाधिकारीही उपस्थित होते.
नागपुर येथील माहेश्वरी भवनात आयोजित या शानदार सोहळ्यात बुलढाणा अर्बन परिवाराचे प्रमुख आणि विदर्भरत्न राधेश्याम चांडक चांडक (भाईजी), महाराष्ट्र प्रदेश केमिस्ट असोसिएशनचे मानद सचिव अनिल नावंदर, विवेक मोहता तसेच बुलढाणा जिल्हा सभा आणि सर्व संघटनेचे पदाधिकारी यांचा सहभागातून दिनदर्शिका प्रकाशन समिती सदस्य तथा विदर्भ प्रदेश माहेश्वरी युवा संघटनेने प्रकाशन सोहळा यशस्वीपणे पार पाडला.