Monday, December 23, 2024
HomeUncategorizedSensex Today: ‘मंगल’वार ! गुंतवणूकदारांमध्ये उत्साह; सेन्सेक्सची ८०० अंकांनी उसळी

Sensex Today: ‘मंगल’वार ! गुंतवणूकदारांमध्ये उत्साह; सेन्सेक्सची ८०० अंकांनी उसळी

अकोला दिव्य न्यूज : गेल्या आठवड्याभरापासून गुंतवणूकदारांवर अक्षरश: रुसलेला मुंबई शेअर बाजार सोमवारी काहीसा तेजीत आला आणि गुंतवणूकरादारांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. गेल्या सलग सात सत्रांमध्ये सातत्याने घसरण नोंदवलेल्या सेन्सेक्सनं आज उसळी घेतली. त्यापाठोपाठ निफ्टी५० नंही नेहमीप्रमाणे सेन्सेक्सच्या पावलावर पाऊल ठेवत सकारात्मक वाढ नोंदवली. त्यामुळे बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये सोमवारी पहिल्या सत्राचे व्यवहार सुरू झाल्यानंतर गुंतवणूकदारांना काहीसा दिलासा मिळाल्याचं बोललं जात आहे.

सेन्सेक्स-निफ्टी एकसाथ !
सेन्सेक्स आणि निफ्टीनं घसरण होणं किंवा वधारणं एकसाथच करण्याचा आपला कल सोमवारी पहिल्या सत्रातही कायम ठेवला. सोमवारी सेन्सेक्स बाजार उघडताच चक्क ८०२ अंकांनी वर गेला. त्यामुळे सकाळी ११ पर्यंत सेन्सेक्सनं ७८,८४४.२५ चा टप्पा गाठला होता. त्यापाठोपठ निफ्टी५० नंही २४३ अंकांची वाढ नोंदवत २३,८२८.६९ अंकांपर्यंत मजल मारली होती.

कुणी दिला मदतीचा हात?
दरम्यान, गेल्या ६ ते ७ सत्रांमध्ये सातत्याने घसरण पाहणाऱ्या सेन्सेक्सला वर आणण्यात बँकिंग, वित्तसेवा आणि आयटी कंपन्यांच्या शेअर्सनं मदतीचा हात दिला. याशिवाय मेटल उद्योग आणि रिअॅल्टी उद्योगांच्या समभागविक्रीनंतर देखील या घडामोडींमध्ये मोठा वाटा उचलला. आज चांगली कामगिरी करणाऱ्या शेअर्समध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि एचडीएफसी बँक यांचा समावेश होता. या दोन्हींच्या शेअर्सनं तब्बल १.७ टक्क्यांची वाढ नोंदवली. त्याशिवाय जेएसडब्ल्यू स्टील, आयटीसी, टेक महिंद्रा आणि विप्रो या कंपन्यांच्या शेअर्सलाही चांगला दर मिळाला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!