Thursday, December 19, 2024
HomeUncategorizedभारतीय रुपया गेला रसातळाला ! डॉलर समोर रुपया 85 रुपये ; सामान्यांवर...

भारतीय रुपया गेला रसातळाला ! डॉलर समोर रुपया 85 रुपये ; सामान्यांवर थेट परिणाम

Rupee Hits Record Low : अकोला दिव्य ऑनलाईन : अमेरिकन सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्हच्या धोरणात्मक बैठकीनंतर जगभरातील शेअर बाजारांवर विपरीत परिणाम होत आहे. भारतीय शेअर बाजाराला याचा मोठा फटका बसल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतीय अर्थव्यवस्था मोठ्या संकटातून जात आहे. त्यात आज आणखी एका गोष्टीची भर पडली. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ऐतिहासिक निच्चांकी पातळीवर घसरला आहे. रुपया प्रथमच ८५ च्या खाली घसरला आहे. चलन बाजारात रुपया १२ पैशांनी घसरला असून एका डॉलरच्या तुलनेत तो ८५.०६ रुपयांच्या खाली घसरला आहे. याचा थेट सर्वसामान्य लोकांवर परिणाम होणार आहे.

डॉलरची मागणी वाढल्याने रुपया कमकुवत
चलन बाजारात रुपया एका डॉलरच्या तुलनेत ८५.०४ वर उघडला आणि ८५.०७ वर घसरला. गेल्या सत्रात रुपया ८४.९६ च्या पातळीवर बंद झाला होता. एका डॉलरच्या तुलनेत रुपया ८५ च्या खाली घसरण्याची ही पहिलीच वेळ आहे. आयातदारांकडून मागणी वाढल्याने आणि विदेशी गुंतवणूकदार शेअर बाजारात विक्री करून आपले पैसे काढून घेत आहेत, यामुळे डॉलरची मागणी वाढली आहे, परिणामी रुपया कमजोर होत आहे.

रुपया कमजोर, शेअर बाजारात विक्री 
यूएस फेडरल बँकेने २ दिवसांच्या बैठकीनंतर १८ डिसेंबर रोजी आपलं धोरण जाहीर केले. बँकेने व्याजदरात एक चतुर्थांश टक्के कपात केली. परंतु, त्यांनी २०२५ साठी महागाई दराचा अंदाज २.१ टक्क्यांवरून २.५ टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. फेडरल रिझर्व्हने म्हटले आहे की ते २०२५ मध्ये फक्त दोनदा व्याजदरात कपात करेल. तर यापूर्वी ४ वेळा कपात करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये निराशा पसरली आहे. फेडच्या या निर्णयामुळे डॉलरच्या तुलनेत रुपयासह इतर चलने कमकुवत झाली आहेत.

सामान्यांवर थेट परिणाम
डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्याने याचा परिणाम थेट सामान्य लोकांवर होणार आहे. कारण, आयात करण्यासाठी डॉलर हे चनल वापरलं जातं. त्यामुळे आता जिथे पूर्वी ८४ रुपये लागत होते, तिथे आता ८५ रुपये लागणार आहे. याचा अर्थ आयात केलेल्या वस्तू महाग होतील. भारत खाद्यतेल, पेट्रोल, डिझेल, इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहनांचे भाग अशा कित्येक गोष्टी बाहेरुन आयात करतो. त्यामुळे देशांतर्गत महागाई वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे भारताची परकीय गंगाजळी कमी होणार आहे.

Oplus_131072


https://www.akoladivya.com/business/banking-loans/rupee-falls-12-paise-to-all-time-low-of-85-07-against-us-dollar-due-to-federal-reserve-hawkish-stance

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!