अकोला दिव्य ऑनलाईन : देशाच्या विकासात उद्योजकांची महत्त्वपूर्ण भूमिका असून बदलत्या अर्थव्यवस्थेचा आता भारतीय उद्योजक हा आर्थिक कणा आहे. मात्र देशातील उद्योगपतींना आज मुद्दामच सरकार लक्ष्य करीत आहे. यामुळे भारतीय उद्योग क्षेत्रांवर विपरीत परिणाम होतो आहे.यामुळे केवळ उद्योगपतींचे मानसिक खच्चीकरण होत नसून, संपूर्णपणे देशाच्या विकासावर आघात होतो आहे. तेव्हा या विरोधात एकजुटीने उभे रहा असे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अँड.आशिष बाहेती यांनी केले आहे.
अशा घटनांचा विरोधात सर्व उद्योगपतींना सोबत घेऊन विरोध करणे आवश्यक आहे. सर्व उद्योजकांनी एकजुट होऊन आवाज बुलंद केला पाहिजे आणि सरकारला हे समजावून सांगा की उद्योगपतींना लक्ष्य करण्याचा प्रयत्न हा देश हितासाठी योग्य नाही. उद्योगपतींवर आपल्या हिताचे रक्षण आणि विकासासाठी लढा देण्याची गरज निर्माण झाली आहे. देशातील राजकीय पुढाऱ्यांना हे समजावून सांगावे लागेल की सर्वात अगोदर हा देश महत्त्वाचा आहे. त्यानंतर बाकी गोष्टी आहेत. त्यांना हे देखील लक्षात आणून देणे आवश्यक आहे की उद्योगपतींना लक्ष्य केले तर सरळसोट देशाच्या विकास खुंटेल आणि अर्थव्यवस्थेचे कधीच भरून निघणार नाही असे नुकसान होऊ शकते.
सर्व उद्योगपतींनी सोबत मिळून अशा प्रयत्नांचा विरोध करने आवश्यक झाले आहे. राजकीय पुढाऱ्यांच्या लक्षात आणून दिले पाहिजे की उद्योगपतींना लक्ष्य केले तर हा देश रसातळाला जाण्यास वेळ लागणार नाही. यासाठी वेळीच उपचार करा,असे आवाहन मारवाडी बिझनेस नेटवर्किंग फाउंडेशन ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष अँड.आशिष बाहेती यांनी केले आहे.