अकोला दिव्य ऑनलाईन : राजस्थानी समाजबांधवांचे आराध्य दैवत खाटूनरेश श्याम बाबा यांचे धार्मिक उत्सव आणि विविध सेवाभावी उपक्रम राबविणारे अकोला शहरातील ‘श्याम के दिवाने’ ग्रुपकडून ४ दिवसीय खाटूधाम यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या 13 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी या कालावधीत आयोजित उत्सवात महिला भाविकांची यात्रा 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 5:30 वाजता अकोला रेल्वे स्टेशन येथून रवाना होणार आहे.
ही यात्रा 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता राजस्थान मधील रिंगस रेल्वे स्टेशन येथे पोहचेल. यानंतर 11 वाजता रिंगस येथून खाटूधाम पर्यंत भव्य निशान यात्रा काढण्यात येईल. खाटूधाम येथे यात्रा पोहचल्यावर रात्रीला भजन संध्या आयोजित केली. यात्रेतील भाविक 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता जीण माता, सालासर बालाजी यात्रा आदि तीर्थ स्थानांचे दर्शन घेऊन जयपुर येथून रात्री 8 वाजता अकोल्यासाठी रेल्वेने रवाना होणार आहेत.
या यात्रेत रेल्वे प्रवास, चहा, नाष्टा, जेवण आणि तीर्थस्थानांसाठी बस सेवा उपलब्ध आहे. खाटूधाम प्रवासासाठी नोंदणी सुरू केली आहे. नोंदणींची शेवटची तारीख 21 डिसेंबर 2024 असून श्याम भक्त महिलांनी नोंदणी व माहितीसाठी अरुण शर्मा 932 599 3444, सुमित शर्मा 997 0912 264, ॲड.सौरभ शर्मा 771 995 5355, यांच्याशी संपर्क करावा. असे आवाहन श्याम के दीवाने ग्रुपने केली आहे.