Friday, December 27, 2024
HomeUncategorizedअकोल्यातील श्याम भुतडा विदर्भातून सन्मानित झालेले एकमेव वीमा व्यावसायिक

अकोल्यातील श्याम भुतडा विदर्भातून सन्मानित झालेले एकमेव वीमा व्यावसायिक

अकोला दिव्य ऑनलाईन : विमा क्षेत्रातील उत्कृष्ठ कार्याबद्दल थायलंड येथील पटाया शहरात एका शानदार सोहळ्यात अकोल्यातील सुप्रसिद्ध विमा व्यवसायी श्याम उर्फ जगदीश भुतडा यांचा सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देत त्यांचा गौरव करण्यात आला. यावर्षी विदर्भातून या कंपनीकडून सन्मानित झालेले ते एकमेव व्यक्ती आहेत. गेल्या पाच वर्षांपासून आयसीआयसीआय लोंबार्ड इन्शुरन्स कंपनीत श्याम भुतडा यांनी आपल्या व्यवसायातून अव्वल स्थान पटकावलं आहे.

श्याम भुतडा यांनी ३५ वर्षांत अथक मेहनत आणि प्रामाणिक सेवेमुळे इन्शुरन्स क्षेत्रात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. विविध नामांकित कंपन्यांसोबत काम करत त्यांनी अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळवले आहेत.वीमा क्षेत्रात त 1989 मध्ये सुरू झालेला प्रवास आजही तसाच अगदी अव्याहतपणे सुरू आहे. त्यांच्याकडे इंडिया इन्शुरन्स, आयसीआयसीआय लोंबार्ड, न्यू इंडिया इन्शुरन्स, टाटा एआयजी, रिलायन्स इन्शुरन्स कंपनी, ओरिएंटल इन्शुरन्स, एचडीएफसी अरगो, आदित्य बिर्ला,अप़ोलो म्युनिक अशा अनेक कंपन्यांच्या शाखा आहेत.

त्यांच्याशी २५०० हून अधिक पॉलिसी होल्डर विश्वास ठेवून जोडले गेले आहेत. भुतडा आपल्या ग्राहकांनासातत्याने २४ तास सेवा देतात. त्यांच्या या समर्पणमुळेच ते उच्च स्थानावर पोहोचले आहेत.

त्यांनी गोवा, दुबई, नेपाळ, मलेशिया, थायलंड आणि अशा अनेक ठिकाणी विविध पुरस्कार आणि सन्मान स्वीकारले आहेत. त्यांच्या मेहनतीचा आणि जिद्दीचा हा प्रवास तरुण पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्वचस्तरातून त्यांचं अभिनंदन होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!