अकोला दिव्य ऑनलाईन : राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण असणार? हा एकमेव प्रश्न राज्यात सर्वाधिक विचारला जात आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री पदाचा पेच निर्माण झाल्याने सरकार स्थापन होण्यासही अडचणी येत आहेत. दरम्यान, यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीची काय भूमिका आहे हेही पाहणं महत्त्वाचं आहे.
महायुतीला महाराष्ट्रातील जनतेले यश दिलं आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात काँग्रेसला सर्वाधिक जास्त बहुमत मिळत होतं, यापेक्षाही जास्त मत महायुतीला मिळालं आहे. मुख्यमंत्री पदाचा निर्णय एक दोन दिवसांत येणं अपेक्षित आहे. तो निर्णय झाला की राज्य सरकार स्थापन होईल. ज्या गतीने अडीच वर्षांत महायुती सरकारने काम केलंय तेवढ्याच गतीने महाराष्ट्र पुढे नेण्याचा प्रयत्न केला जाईल, असं सुनील तटकरे महाराष्ट्रातील सत्तास्थापनेबाबत म्हणाले.
मुख्यमंत्री पदाचा निर्णय राष्ट्रीय पातळीवर होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार त्या ठिकाणी आहेत. त्यांच्यासंदर्भात वरिष्ठ निर्णय घेतील”, असं सुनील तटकरे म्हणाले.
महायुतीचा फॉर्म्युला ठरला होता का?
महायुतीचा कोणताही फॉर्म्युला ठरला नव्हता. जे काही ठरेल ते एक दोन दिवसात ठरेल, असं सुनील तटकरेंनी स्पष्ट केलं.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांनी दिलेल्या ‘बटेंगे तो कटेंगे’ आणि पंतप्रधान मोदी यांचा ‘एक है तो सेफ” चा गजर हिंदूत्वासाठी असल्याने मतदारांनी विरोधकांना भुईसपाट केले.पण तब्बल ४ दिवसांचा कालावधी उलटून जात असताना, राज्यात नवीन सरकार अस्तित्वात आले नाही. शिवसेनेची बंडखोरी हिंदुत्वासाठी होती. मग आता मुख्यमंत्रीपद एवढं महत्वाचे का ? पुन्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर काय होईल. हिंदूत्वासाठी नाही तरी अडीच वर्षे फडणवीस उपमुख्यमंत्री राहिले आहेच ना मग अजून अडीच वर्षे राहिले तर काय अस्मानी संकट येईल ! एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत देखील हेच म्हणावे लागेल की, मुख्यमंत्रीपदाची चव चाखायला मिळाली ना ! मग ही ओढाताण का ! कॉंग्रेस पक्षावर सत्ता व पदाच्या लालसेचा आरोप करणाऱ्यांचाही शेवटचं लक्ष्य सत्ताच आहे, हे कथीत हिंदूत्ववाद्यानी लक्षात घेतले पाहिजे.