Wednesday, November 20, 2024
HomeUncategorizedप्राणघातक हल्ला ! जळगाव जामोद मतदारसंघात खळबळ उडाली ! उमेदवारावर अकोल्यात उपचार...

प्राणघातक हल्ला ! जळगाव जामोद मतदारसंघात खळबळ उडाली ! उमेदवारावर अकोल्यात उपचार सुरू

अकोला दिव्य ऑनलाईन : महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या जीवघेणा हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर अजून तीन उमेदवारांवर अशा प्रकारे हल्ला झाल्यानंतर जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे जन स्वराज्य पक्षाचे उमेदवार प्रशांत डिक्कर यांच्यावर आज पहाटे ५ वाजता शेगाव- मनसगाव रोडवर कालखेड फाट्याजवळ अज्ञातांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेनंतर जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात खळबळ उडाली असून त्यांना उपचारासाठी अकोला येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र स्वराज्य पार्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार जनशक्ती आणि वामनराव चटप यांची शेतकरी संघटना अशा पक्षांची आघाडी असलेल्या परिवर्तन महाशक्तीचे प्रशांत काशिराम डिक्कर हे अधिकृत उमेदवार आहेत. त्यांनी मतदारसंघात कडवे आव्हान उभं केलं असून प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी लढा देणारे अशी प्रशांत डिक्कर यांची ओळख असून जळगाव जामोद मतदारसंघातील ग्रामीण भागातील मतदारांकडून त्यांना चांगला प्रतिसाद मिळताना असल्याची मतदारसंघात चर्चा आहे. (सविस्तर बातमी लवकरच)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!