Tuesday, January 28, 2025
HomeUncategorizedमोठी बातमी ! भाजपाचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे व उमेदवार राजन नाईक...

मोठी बातमी ! भाजपाचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे व उमेदवार राजन नाईक विरोधात गुन्हे दाखल

अकोला दिव्य ऑनलाईन : विरार मध्ये आज मंगळवारी गाजलेल्या पैसे वाटप नाट्य प्रकरणात तुळींज पोलीस ठाण्यात एकूण ४ गुन्हे दाखल झाले आहेत. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि भाजप उमेदवार राजन नाईक तसेच आमदार क्षितीज ठाकूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली
आहे.

विरारच्या विवांता हॉटेल मध्ये भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे पैसे वाटप करत असल्याचा आरोप करत बहुजन विकास आघाडीने केला आणि चार तास धुमाकूळ घातला. यावेळी भाजपच्या नेत्यांनाही मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी बविआच्या तक्रारीवरून निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी संपूर्ण हॉटेलची तपासणी केली असता ९ लाख ९३ हजार रुपये रोख तसेच कागदपत्रे, डायरी आणि इतर प्रचार साहित्य जप्त करण्यात आले आहे. याप्रकऱणी नालासोपारा येथील तुळींज पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर मतदानाच्या आदल्या दिवशी मतदारसंघात बेकायेदशीर प्रवेस करून सभा घेणे, पत्रकार परिषद घेणे याप्रकरणी आचारसंहिता उल्लंघनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर रोख रक्कम हॉटेलच्या खोलीत आढळल्याने भाजप उमेदवार राजन नाईक यांच्यासाहीत अन्य भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी दिली. शिंदे गटाचे नेते सुदेश चौधरी यांना मारहाण केल्याप्रकरणी आमदार क्षितीज ठाकूर आणि अन्य ५-६ जणांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!