आज महायुतीचे उमेदवार अग्रवाल यांच्या प्रचारासाठी १२ वाजता बाइक रॅली

0

अकोला दिव्य ऑनलाईन : अकोला पश्चिम मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विजय अग्रवाल यांच्या प्रचारासाठी आज सोमवार १८ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ ते ४ वाजता पर्यंत शहरातील विविध भागातून मार्गस्थ होत असलेली मोटारसायकल रॅली आयोजित करण्यात आली आहे. मोटारसायकल रॅलीची सुरुवात जुने शहरातील रेणुका माता मंदिर येथून होणार असून खुले नाट्यगृह समोर असलेल्या भारतीय जनता पक्षाचा कार्यालयात रॅलीचे समापन करण्यात येणार आहे.

महायुतीचे अधिकृत उमेदवार विजय कमलकिशोर अग्रवाल यांच्या प्रचारार्थ १२ वाजता निघत असलेली बाईक रॅली रेणुका माता मंदिर येथून भिरड हॉटेल डाबकी रोड, भांडपुरा चौक -किल्ला चौक – राज राजेश्वर मंदिर – जयहिंद चौक – सिटी कोतवाली चौक – नवीन बस स्टेन्ड- अशोक वाटिका – सिंधी कॅम्प – कौलखेड संत तुकाराम चौक नेहरू पार्क चौक- अशोक वाटिका या मार्गाने मार्गस्थ होऊन नवीन बस स्टॅण्ड मार्गे भाजपा कार्यालय येथे पोहचून येथे समापन होणार आहे.

या रॅलीत भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here