अकोला दिव्य ऑनलाईन : अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत उमेदवार हरिशभाई आलीमचंदानी यांनी बाळापूररोड वरील नवीन होलसेल मार्केटमधील व्यापारी उद्योजक आणि कामगारांच्या भेटीगाठी घेऊन आपल्या आजच्या प्रचाराला सुरुवात केली असता त्यांना मतदारांचे मोठे पाठबळ मिळाले.सर्वांना परिचित आणि वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत उमेदवार हरीशभाई आलीमचंदानी यांनी नवीन होलसेल मार्केट मधील व्यापाऱ्यांना भेट देण्यास सुरुवात केली असता, त्यांचा विजय निश्चित आहे. असा विश्वास दिला आहे.
भाजपा उमेदवार हे अकोला मनपाचे महापौर असतांना शहरातील मालमत्ता टॅक्स वाढीचा निर्णय घेतला. टॅक्सीच्या वसुलीचा स्वाती नावाच्या खाजगी कंपनीला ठेका दिला. त्यामुळे व्यापाऱ्यांना वेठीस धरले जात आहे. मनपामध्ये सत्ता दिल्यावर ही स्थिती आहे. तर राज्यात सत्ता दिली तर मोठ्या प्रमाणावर व्यापाऱ्यांची आर्थिक कोंडी केली जाईल.अशा शब्दात व्यावसायिकांनी आपल्या तक्रारीचा पाढा वाचला. सर्वमान्य उमेदवार म्हणून केवळ हरिशभाई आलीमचंदानी हेच एकमेव पर्याय आहेत. सामान्य माणसाचे प्रश्न व व्यावसायिकांच्या अडचणी व समस्या हरीश आलिमचंदानी चांगल्याप्रकारे जाणून आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली सर्वच घटकांना न्याय मिळेल, असं मत व्यक्त करुन येथील व्यापारी व उद्योजकांनी मोठ पाठबळ दिले.