डॉ.योगेश साहू भाजप ओबीसी मोर्चा महाराष्ट्र उपाध्यक्षपदी

0
डॉ.योगेश साहू भाजप ओबीसी मोर्चा महाराष्ट्र उपाध्यक्षपदी

अकोला दिव्य न्युज ब्युरो : भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चाच्या महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदावर अकोल्यातील सुप्रसिध्द दंत शल्य चिकित्सक व भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते डॉ. योगेश साहू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेर्तृत्वात भाजपचे महाराष्ट्रात गतिमान संघटन आणि विकासकार्य सुरू आहे. पंतप्रधान नरेन्द्र मोदींनी विश्वकर्मा योजना सुरू करून महाराष्ट्राला 18 हजार कोटींचा निधी दिलेला आहे. त्या निधीचे योग्य वितरण आणि त्याचा लाभ जास्तीत जास्त समाजबांधवांना झाला पाहिजे ही पक्षाची भूमिका आहे.

यापूर्वी वैद्यकीय आघाडी व महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य अकोला पश्चिम या पदावर डॉ.साहू यांनी काम केलेले आहे व कार्यरत आहेत. ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष म्हणून डॉ. योगेश साहू यांची निवड बावनकुळे, आ.आशिष देशमुख व संजय गाते यांनी केली. डॉ.साहू तंबाखू आपल्या दवाखान्यात तंबाखू प्रतिबंधात्मक केंद्र निशुल्क चालवतात. तसेच श्री गजानन महाराज संस्थान शेगाव येथील रूग्णसेवेतही कार्यरत असून लोकसेवा संघ या सामाजिक संघटनेचे विद्यमान संस्थापक अध्यक्ष,तसेच इंडियन डेंटल असोसिएशनचे दोन वेळा अध्यक्षपद भूषविले आहे.सध्या इंडियन डेंटल असोसिएशनचे सल्लागार आहेत. त्याच्या निवडीबद्दल असंख्य स्नेहीजण व कार्यकर्त्यांकडून अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here