Friday, December 27, 2024
Homeताज्या बातम्याविजयबाप्पू देशमुख यांच्या निवासस्थानी खा. प्रफुल्ल पटेल यांची सदिच्छा भेट

विजयबाप्पू देशमुख यांच्या निवासस्थानी खा. प्रफुल्ल पटेल यांची सदिच्छा भेट

अकोला दिव्य ऑनलाईन : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री खासदार प्रफुल्लभाई पटेल यांनी आज अकोला येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अकोला महानगर अध्यक्ष विजयबाप्पू देशमुख यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेऊन चर्चा केली. अकोला जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी अकोला येथील कृषी विद्यापीठाच्या विस्तीर्ण पटांगणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचं आयोजन करण्यात आले होते. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल देखील पंतप्रधान मोदी यांच्यासोबत उपस्थित होते.

पंतप्रधान मोदी यांची सभा पार पडल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी महानगर अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे (अ.प) नेते विजयबाप्पू देशमुख यांच्या सुधीर कॉलनी येथील निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट दिली. महानगर अध्यक्ष विजयबाप्पू यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यासोबतच आ.अमोल मिटकरी, वाशिम जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, माजी नगरसेवक दिलीप देशमुख, मनोज गायकवाड, गौतम गवई,अजय मते, संतोष डाबेराव,सुधिर शाहकार, रणजित धोत्रे यांच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पटेल यांची भेट घेऊन स्वागत केले. यावेळी पक्ष संघटना अधिक सक्षम व मजबूत करण्यासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!