Thursday, December 26, 2024
Homeताज्या घडामोडीभाजपात घाणेरडे राजकारण ! आलिमचंदाणी यांचा आरोप ! भाजपला सोडचिठ्ठी : सदस्यत्वासह...

भाजपात घाणेरडे राजकारण ! आलिमचंदाणी यांचा आरोप ! भाजपला सोडचिठ्ठी : सदस्यत्वासह पदांचा राजीनामा

अकोला दिव्य ऑनलाईन : अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात उमेदवारी नाकारल्यानंतर पक्षाने जाहीर केलेल्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात निवडणूक मैदानात उतरलेले भाजपा नेते हरीश आलिमचंदानी यांनी पक्षश्रेष्ठींनी कारवाईचा बडगा उगारण्यापुर्वी पक्ष सदस्यतासोबत आपल्याकडील पदांचा राजीनामा दिला आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांना एक लांबलचक पत्र लिहून आलिमचंदानी यांनी भाजपात मागील 10 वर्षांपासून घाणेरडं राजकारण केले गेले. असा गंभीर आरोप करत मनात खदखदत असलेल्या असंतोषाला वाट मोकळी करून दिली.

अकोला भाजपात मागील 10 वर्षांपासून घाणेरडं राजकारण सुरू असल्याचा आरोप लावत, राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांना पाठवलेल्या पत्रात आलिमचंदानी यांनी नमूद केले आहे की, मी भारतीय जनता पक्षाचा नगरसेवक होतो. पक्षाने वेळोवेळी मला दिलेली जबाबदारी मी कार्यक्षमतेने पार पाडली. परंतु मागील काही काळापासून पक्षात मतभेद निर्माण झाले होते. परंतु त्यांच्याशी मला काहीच घेणे देणे नव्हते. तरीही मी पक्षाचे काम करत होतो. मी वरिष्ठ नगरसेवक असूनही, मागील 10 वर्षांपासून काहीजण घाणेरडं राजकारण करत मला अपमानास्पद वागणूक देत होते.

महोदय, 2024 मध्ये महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होत आहे. मी सुद्धा 30 वर्षांपूर्वी पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी संपर्क साधून सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय कार्याची माहिती देऊन अकोला पश्चिममधून उमेदवारी मागितली होती. विधानसभा मतदार संघ तयार केला. मात्र संघटनेने अकोला शहरातील दुसऱ्या म्हणजे अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या प्रभागातील उमेदवाराचे तिकीट अकोला पश्चिम मतदारसंघाशी जोडले, हा पूर्णपणे चुकीचा निर्णय आहे. पक्षाच्या वरिष्ठांच्या या निर्णयामुळे अकोला शहरातील जनतेमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली असून त्यांनाही भारतीय जनता पक्षाचा पर्याय हवा आहे. हे लक्षात घेऊन तसेच शहरातील जनतेच्या मागणी व मान्यतेवर मी अकोला पश्चिम मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून उभा आहे.

पक्षाने दिलेली जबाबदारी मी पूर्णपणे पार पाडली होती. पण आता मी माझ्या अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे. यासाठी मी आज दिनांक 4/11/2024 पासून पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा देत आहे. कृपया माझी ही विनंती मान्य करा.असं आलिमचंदानी यांनी लिहिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. या पत्राची प्रत महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बावनकुळे आणि अकोला महानगर अध्यक्ष जयंत मसने यांना पाठविल्या आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!