अकोला दिव्य ऑनलाईन : अकोला जिल्ह्यामध्ये प्रा.नितीन बाठे यांनी अनेक वर्षांपूर्वी लावलेले रोपटे आज वटवृक्ष झाले आहे. या वटवृक्षाची सावली अकोलेकरांना सर्वोत्तम आरोग्याचा गारवा देत राहील, संस्थाध्यक्ष प्रा.नितीन बाठे यांच्यासारख्या दूरदृष्टी व सेवाभावी व्यक्तिमत्वाची भेट झाल्याने दिवाळीच्या पर्वावर सर्वोच्च आनंद झाला असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेच्या विदेश विभागाचे पूर्व महामंत्री प्रशांत हरताळकर यांनी केले.
अकोला येथील श्री समर्थ ग्रुप ऑफ एज्युकेशन संस्थेद्वारे रिधोरा येथे संचालित श्री समर्थ आयुर्वेद रुग्णालय व महाविद्यालयात आज धनत्रयोदशीच्या पावन पर्वावर धन्वंतरी पूजन, धन्वंतरी याग व धन्वंतरी सन्मान असा त्रिवेणी समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून विश्व हिंदू परिषदेच्या विदेश विभागाचे पूर्व महामंत्री प्रशांत हरताळकर बोलत होते. ते पुढे म्हणाले की, विश्व हिंदू परिषदेचे कार्य समर्पित भावनेने करतांना, मुळचा अकोला येथील असूनही अकोला येथे येण्याचा फारसा योग येत नाही.
आज अकोला येथे श्री समर्थ ग्रूप ऑफ एज्युकेशन संस्थेच्या अत्याधुनिक सुविधायुक्त आयुर्वेदिक रुग्णालय व महाविद्यालयाला भेट देण्याचा सुवर्ण योग जुळून आला. संस्थाध्यक्ष प्रा.नितीन बाठे यांच्यासारखे दूरदृष्टी व सेवाभावी व्यक्तिमत्वाची दिवाळीच्या पर्वावर भेट झाल्याने सर्वोच्च आनंद झाला.असे हरताळकर यांनी सांगितले.
समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून विश्व हिंदू परिषदेच्या विदेश विभागाचे पूर्व महामंत्री प्रशांत हरताळकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग संघचालक नरेंद्र देशपांडे, श्री समर्थ ग्रुप ऑफ एज्युकेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. नितिन बाठे व्यासपीठावर विराजमान होते.
कार्यक्रमामध्ये अकोला जिल्ह्यातील प्रसिद्ध धन्वंतरी डॉ. नानासाहेब चौधरी, डॉ.आर.बी.हेडा, डॉ.अनंत श्रावगी, डाॅ.माधुरी राव, डाॅ.महेंद्र ताम्हणे, डॉ. सचिन म्हैसने, डाॅ.शितल टोंगसे, डाॅ,प्रभाकर जायभाये, डाॅ.आशीष चांडक, डॉ.पूनम राऊत, डॉ.पियूष मथारीया, डाॅ.जयश्री तामसकर, डॉ.मनिषा भगत, डॉ. रश्मी इंगळे, डॉ.नवीन दमानिया, डॉ. संतोष ठोंबरे यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह,भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुण्यांची समयोचित भाषणे झाली. समारंभाला प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा.राजेश बाठे, प्रा.जयश्री बाठे, प्रा.किशोर कोरपे , प्रा.किशोर रत्नपारखी, प्रा.योगेश जोशी, प्रा.जी.सी.राव, प्राचार्य आशिष चांडक, प्राचार्य सुवर्णा गुप्ता, अश्विनी थानवी, प्राचार्य मुग्धा कळमकर, प्राचार्य ग्यानदीनाहरी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. डाॅ.महेंद्र ताम्हणे यांनी संस्थेच्या प्रदीर्घ वाटचालीचा आणि कार्याचा गौरव केला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री समर्थ ग्रूप ऑफ एज्युकेशन संस्थेच्या सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तथा आयुर्वेदिक रुग्णालय व नर्सिंग काॅलेजच्या सर्वांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.महेश जोशी तर आभार प्रदर्शन आतिश सोसे यांनी केले.