अकोला दिव्य ऑनलाईन : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास केवळ दोन दिवसांचा कालावधी शिल्लक असताना, शिंदे यांच्या दाव्यातील बाळापूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार अद्याप जाहीर करण्यात आले नाही. मात्र अंतिम टप्प्यात माजी आमदार बळीराम सिरस्कार यांना पक्ष प्रवेश देत, शिवसेनेची उमेदवारी देण्याचा निर्णय झाला असल्याचा दावा सुत्रांनी केला आहे.
अकोला जिल्हा आणि अकोला लोकसभा मतदारसंघात शिंदे सेनेचे अस्तित्व नगण्य असून, बाळापूर विधानसभा मतदारसंघातील जातीय गणीत आणि वंचित बहुजन आघाडीत माजी आमदार नातिकोद्दीन खतीब यांच्या प्रवेशाने बदलेले समिकरणे लक्षात घेऊन बळीराम सिरस्कार एक सक्षम उमेदवार ठरतात. विशेष म्हणजे जिल्ह्यातील राजकारणात वर्चस्व असलेल्या भाजपाच्या गटाने देखील सिरस्कार यांना पाठिंबा दर्शविला आहे.
माजी आमदार नारायणराव गव्हाणकर यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करुन घेऊन उमेदवारी देण्यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यामार्फत फिल्डींग लावलेली आहे. मात्र सिरस्कार पुर्वश्रमीचे वंचित बहुजन आघाडीचे आमदार असून, या पक्षातील अनेकांशी मैत्रीचे संबंध ठेवून आहेत. सिरस्कार या मतांची बेगमी करू शकतात. तर बाळापूर विधानसभा मतदारसंघातील भाजपा नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते देखील सिरस्कारांसोबत आहे. पण राजकारणात शेवटच्या क्षणी काहीही होऊ शकतं