अकोला दिव्य न्युज ब्युरो : अकोला शहरातील एकमात्र आणि वाहतुकीसाठी जवळपास एक वर्षानंतर पुन्हा सुरु करण्यात आलेला नवीन उड्डाणपूल जीवासाठी धोकादायक तर नाही ना ? अशी भिती वाहनचालकांना वाटत आहे. आज शिवसेनेच्या वतीने आंदोलन करुन शासन, प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे लक्ष आकर्षून घेतले. याबाबत मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जाहीर निवेदन दिले गेले नाही. विशेष म्हणजे शिवसेना (उबठा) कडून उड्डाणपूलचे पिलर अंकित करण्यात आले आहे.
अशोक वाटिका चौका जवळून मुर्तिजापूररोडकडे वळसा असलेल्या उड्डाणपुलाच्या तुटलेल्या भागाची नुकतीच दुरुस्ती करुन हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
परंतु दुरुस्ती करताना त्याच्यात जुने तुटलेले ब्लॉक बसवण्यात आले.अशा स्थिती भाजपा नेत्यांनी पुल वाहतुकीसाठी पुन्हा सुरू केला. पुलाच्या कामात कमालीचा भ्रष्टाचार झाला असून, भविष्यात अप्रिय घटना घडू शकते. यासाठी शिवसेनेतर्फे वारंवार आंदोलन करण्यात आले. मात्र झोपेचं सोंग घेऊन असल्याने सरकारला जागे येणार कशी ? असा आरोप शिवसेना शहर प्रमुख राजेश मिश्रा व पदाधिकार्यांनी केला आहे