Tuesday, October 22, 2024
Homeसामाजिकतुम्हीही असं करता ? नवरा किंवा बायकोसमोर जोराने पादत असाल तर तुमचं...

तुम्हीही असं करता ? नवरा किंवा बायकोसमोर जोराने पादत असाल तर तुमचं नातं…

Farting Make Husband Wife Relationship Strong Healthy

अकोला दिव्य ऑनलाईन : आपल्या समाजात फार्टिंग ज्याला आपण पादणे असं म्हणतो, तो एक हसण्याचा किंवा लाजेचा विषय मानला जातो. परंतु, खरं पाहिलं तर ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. दरवेळी जेव्हा आपण काही खातो, तेव्हा आपल्या पोटात गॅस तयार होतो, जो कधी आवाजाने तर कधी न आवाजाने बाहेर पडतो. गंमतीशीर बाब म्हणजे फार्टिंग ही एक चांगल्या पचनसंस्थेची खूण आहे.परंतु, काही वेळा असे अन्न पदार्थ खाल्ले जातात ज्यामुळे फार्टिंगमध्ये दुर्गंधी येते. आता हे समजून घेऊया की फार्टिंग का होते, ते आपल्या नातेसंबंधांवर कसा प्रभाव पाडते. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण याच फार्टिंग मुळे रिलेशनशिप अधिक घट्ट होते असे म्हणतात.

पादणं ही नैसर्गिक प्रक्रिया

फार्टिंग ही आपल्या शरीरातील गॅस बाहेर काढण्याची प्रक्रिया आहे. शरीरातील अन्नाचे पचन होताना विविध रासायनिक प्रक्रियेमुळे गॅस तयार होतो. हा गॅस बाहेर न पडल्यास आपल्या शरीराला हानी होऊ शकते. फार्टिंग आणि ढेकर हा गॅस बाहेर सोडण्याचे नैसर्गिक मार्ग आहेत. काही वेळा हा गॅस वासरहित असतो, परंतु काही वेळा गॅस वासयुक्त असतो, विशेषत: जेव्हा आपल्या आहारात कांदा, लसूण, ब्रोकली, राजमा, अंडी यांसारखे पदार्थ असतात. त्यामुळे, फार्टिंग ही एक अत्यंत सामान्य प्रक्रिया आहे आणि त्यात लाज वाटण्यासारखं काही नाहीये.

स्टडीमध्ये काय म्हटलं ?

MIC नावाच्या एका कंपनीने रिलेशनशिपमध्ये फार्टिंग संदर्भात स्टडी केली होती. ज्यात असे आढळून आले की 29 टक्के लोकांना लग्नानंतरच्या 2 ते 6 महिन्यांनंतर नवीन जोडीदारासमोर पादायला लाज वाटत नाही. हीच ती वेळ असते जेव्हा जोडपे एकमेकांच्या प्रेमात पडत असतात आणि एकमेकांना हळूहळू ओळखू लागत असतात. या काळातच चांगले वाईट गुण कळतात आणि विश्वास व प्रेम दोन्ही वाढते. तर 25 टक्के लोक रिलेशनशिपमध्ये आरामदायी होईपर्यंत 6 ते 12 महिन्यांपर्यंत पाजण्यासाठी योग्य वेळेची वाट बघतात. या सर्वेक्षणात सांगितले की एकमेकांसमोर बिनधास्त पादल्याने नात्यातील जवळीक वाढते, या दरम्यान ते एकमेकांसमोर आरामदायक होतात. इतकेच नाही तर जर तुमच्या जोडीदारासमोर कोणतीही लाज न बाळगता तुम्ही फार्ट करत असाल तर तुम्ही त्यांच्याशी लग्न करावे, कारण जर कोणी तुमच्यावर खरे प्रेम करत असेल तर तो तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत स्वीकारेल.

नातंही अधिक दृढ होतं

विविध अभ्यासांनुसार असे दिसून आले आहे की, जे कपल्स एकमेकांच्या समोर फार्टिंग करण्यास लाजत नाहीत, त्यांचे नाते अधिक मजबूत होते. एकमेकांसमोर फार्ट करणं म्हणजे एकमेकांना जसे आहात तसे स्वीकारणे. गुरुग्रामच्या रिलेशनशिप एक्सपर्ट डॉ. गीतांजली शर्मा यांच्या मते, फार्टिंग म्हणजे नात्यातील पारदर्शकता आणि मोकळेपणाचं प्रतीक आहे. अशा कपल्समध्ये एकमेकांना बदलण्याची अपेक्षा नसते, त्यांच्यात विश्वास अधिक असतो आणि त्यांच्या नात्यात कोणतेही गुपित राहात नाही.

टेन्शन कमी करते

फार्टिंग हे नात्यात हास्य आणते आणि थोड्या वेळासाठी का होईना, पण नात्यातील तणाव कमी करण्यास मदत करते. कपल्स जे एकमेकांसमोर फार्ट करतात, त्यांच्यात ताणतणाव कमी असतो आणि ते अधिक आनंदी असतात. हसण्यामुळे तणाव कमी होतो, जो मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर असतो. त्यामुळे, फार्टिंगच्या माध्यमातून निर्माण होणारे हास्य आपल्या नात्याला अधिक सुदृढ करू शकते.

शरीराच्या बदलांकडे दुर्लक्ष

जसे वय वाढते, तसा शरीरात बदल होतो. व्यक्तीचे वजन वाढते, केस गळतात आणि शरीराच्या अनेक भागात बदल होतो. परंतु जे कपल्स फार्टिंगसारख्या गोष्टीत लाजत नाहीत, ते एकमेकांच्या शरीरातील बदलांना स्वीकारतात. त्यांनी एकमेकांच्या लुक्सची कधीच चिंता करत नाहीत आणि त्यांच्या नात्यात कुठल्याही प्रकारची असुरक्षा येत नाही.

सांगायचा मुद्दा काय तर फार्टिंग ही एक अत्यंत नैसर्गिक प्रक्रिया आहे, ज्यामुळे आपल्याला लाज वाटण्याची किंवा हसण्याची गरज नाही. हे आपल्या नात्यातील पारदर्शकता आणि मोकळेपणाचे लक्षण आहे. त्यामुळे, पुढच्या वेळी जर तुम्हाला फार्टिंगबद्दल अस्वस्थ वाटले तर लक्षात ठेवा की ते आपल्या आरोग्यासाठी आणि रिलेशनशिपसाठी फायदेशीर आहे!

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!