Sunday, October 20, 2024
Homeताज्या बातम्यारणधीर सावरकरांची हॅट्ट्रिक ! पिंपळे-भारसाकळे 'रन आऊट' ? पश्चिम 'वेटींग' वर ;...

रणधीर सावरकरांची हॅट्ट्रिक ! पिंपळे-भारसाकळे ‘रन आऊट’ ? पश्चिम ‘वेटींग’ वर ; अनेक आमदार ‘रिपीट’

अकोला दिव्य ऑनलाईन : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आज रविवार २० ऑक्टोबर रोजी तब्बल ९९ उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली असून, भाजपा पक्षश्रेष्ठींनी अकोला पुर्व विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार रणधीर सावरकर यांच्यावर तिसऱ्यांदा विश्वास टाकला आहे. अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीत अकोला पुर्व विधानसभा मतदारसंघात भाजपा उमेदवार अनुप धोत्रे यांना मिळालेल्मया मताधिक्याने आ.सावरकर यांची मतदारसंघावर मजबूत पकड असल्याचे स्पष्ट झाले आहे. आ. सावरकर यांनी १० वर्षात हा मतदारसंघ घट्ट बांधला असल्याने यंदा ते विजयाची हॅटट्रिक साधणार, असं चित्र दिसत आहे. जाहीर झालेल्या यादीचे अवलौकन केले असता, एक लक्षात येते की, मोठ्या संख्येने विद्यमान आमदारांना उमेदवारी दिली गेली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पराभवाचा धसका घेऊन पक्षश्रेष्ठींनी अनेकांना रिपीट केले आहे.

अकोला पश्चिम मतदारसंघ हा भाजपचा गड असताना, मागील निवडणुकीत स्व.गोवर्धन शर्मा यांच्या निसटत्या विजयाने पक्षश्रेष्ठींनी सावध भूमिका घेतली आहे. स्व. लालाजी यांच्या कुटुंबीयांचा दावा नाकारता येत नाही तर इतर इच्छुकांचा दावा देखील फेटाळून लावणे अवघड आहे. यामुळे पहिल्या यादीत उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता कमीच होती. मात्र अकोला पश्चिम मतदान संघात उमेदवारीसाठी प्रचंड रस्सीखेच सुरू असल्याने सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

पहिल्या यादीतून अकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे आणि मुर्तीजापुरचे आमदार हरीश पिंपळे यांचे नाव वगळले गेले असून, दोन्ही विद्यमान आमदार यंदा उमेदवारीच्या शर्यतीत ‘रन आऊट’ असल्याचे ‘रिप्ले’ मध्ये दिसतं आहे. मात्र अपिल असल्याने ‘थर्ड अम्पायर’ च्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे. दोन टर्ममध्ये हरीश पिंपळे मतदार संघाची बांधणी करण्यात सपशेल अपयशी ठरले असून पक्षातच त्यांना वाढतं चाललेला विरोध आणि दुस-यांदा केवळ १९०० मतांनी झालेला निसटता विजय लक्षात घेऊन पक्षाने सावधगिरी बाळगली आहे. आमदार भारसाकळे मोदी लाटेत निवडणूक आले असून, यंदा पार्सल उमेदवार नको, अशी पक्षातून सूर एकवटला आहे. त्यामुळे नवीन उमेदवार देण्याची मागणी लक्षात घेऊन भारसाकळे यांना वेटींगवर ठेवले आहे.

पाहा संपूर्ण यादी

नागपूर पश्चिम – देवेंद्र फडणवीस
कामठी -चंद्रशेखर बावनकुळे
शहादा – राजेश पाडवी
नंदूरबार- विजयकुमार गावीत
धुळे शहर -अनुप अग्रवाल
सिंदखेडा – जयकुमार रावल
शिरपूर – काशीराम पावरा
रावेर – अमोल जावले
भुसावळ – संजय सावकारे 
जळगाव शहर – सुरेश भोळे 
चाळीसगाव – मंगेश चव्हाण 
जामनेर -गिरीश महाजन 
चिखली -श्वेता महाले 
खामगाव – आकाश फुंडकर 
जळगाव (जामोद) – संजय कुटे 
अकोला पूर्व – रणधीर सावरकर
धामगाव रेल्वे – प्रताप अडसड 
अचलपूर – प्रवीण तायडे 
देवली – राजेश बकाने 
हिंगणघाट – समीर कुणावार वर्धा – पंकज भोयर 
हिंगना – समीर मेघे 
नागपूर दक्षिण – मोहन माते 
नागपूर पूर्व – कृष्ण खोपडे
तिरोरा – विजय रहांगडाले 
गोंदिया – विनोद अग्रवाल 
अमगांव – संजय पुरम
आर्मोली – कृष्णा गजबे 
बल्लारपूर – सुधीर मुनगंटीवार 
चिमूर – बंटी भांगडिया 
वाणी – संजीवरेड्डी बोडकुरवार 
रालेगाव – अशोक उडके 
यवतमाळ – मदन येरवर 
किनवट – भीमराव केरम 
भोकर – क्षीजया चव्हाण 
नायगाव – राजेश पवार 
मुखेड – तुषार राठोड 
हिंगोली – तानाजी मुटकुले 
जिंतूर – मेघना बोर्डीकर 
परतूर – बबनराव लोणीकर
बदनापूर -नारायण कुचे 
भोकरदन -संतोष दानवे 
फुलंब्री – अनुराधा चव्हाण
औरंगाबाद पूर्व – अतुल सावे 
गंगापूर – प्रशांत बंब 
बगलान – दिलीप बोरसे 
चंदवड – राहुल अहेर
नाशिक पुर्व – राहुल ढिकाले 
नाशिक पश्चिम – सीमाताई हिरे 
नालासोपारा – राजन नाईक 
भिवंडी पश्चिम – महेश चौघुले 
मुरबाड – किसन कथोरे 
कल्याम पूर्व – सुलभा गायकवाड 
डोंबिवली – रवींद्र चव्हाण 
ठाणे – संजय केळकर 
ऐरोली – गणेश नाईकबेलापूर – मंदा म्हात्रे 
दहिसर – मनीषा चौधरी 
मुलुंड – मिहिर कोटेचा 
कांदिवली पूर्व – अतुल भातखलकर 
चारकोप – योगेश सागर 
मालाड पश्चिम – विनोद शेलार
गोरेगाव – विद्या ठाकूर
अंधेरी पश्चिम – अमित साटम 
विले पार्ले – पराग अलवणी 
घाटकोपर पश्चिम – राम कदम 
वांद्रे पश्चिम – आशिष शेलार 
सायन कोलीवाडा- तमिल सेल्वन 
वडाळा – कालिदास कोळंबकर 
मलबार हिल – मंगलप्रभात लोढा 
कुलाबा – राहुल नार्वेकर 
पनवेल – प्रशांत ठाकूर 
उरन – महेश बाल्दी 
दौंड- राहुल कुल 
चिंचवड – शंकर जगताप 
भोसली -महेश लांडगे 
शिवाजीनगर – सिद्धार्थ शिरोले 
कोथरुड – चंद्रकांत पाटील 
पर्वती – माधुरी मिसाळ 
शिर्डी – राधाकृष्ण विखे पाटील 
शेवगाव – मोनिका राजले 
राहुरी शिवाजीराव कर्डिले 
श्रीगोंदा – प्रतिभा पाचपुते 
कर्जत जामखेड – राम शिंदे 
केज – नमिता मुंदडा 
निलंगा- संभाजी पाटील निलंगेकर 
औसा – अभिमन्यू पवार 
तुळजापूर – राणा जगजितसिंह पाटील 
सोलापूर शहर उत्तर – विजयकुमार देशमुख
अक्कलकोट – सचिन कल्याणशेट्टी 
सोलापूर दक्षिण – सुभाष देशमुख 
मान -जयकुमार गोरे 
कराड दक्षिण – अतुल भोसले 
सातारा – शिवेंद्रराजे भोसले 
कणकवली – नितेश राणे 
कोल्हापूर दक्षिण – अमल महाडिक 
इचलकरंजी – राहुल आवाडे 
मिरज – सुरेश खाडे 
सांगली – सुधीर गाडगीळ 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!