Sunday, October 20, 2024
Homeराजकारणजरांगे पाटलांची मोठी घोषणा ! विधानसभा निवडणुक लढवायची

जरांगे पाटलांची मोठी घोषणा ! विधानसभा निवडणुक लढवायची

अकोला दिव्य ऑनलाईन : राज्यात गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चर्चेत आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील केलेली आहे. यासाठी त्यांनी अनेकवेळा उपोषण आणि आंदोलनही केलं. मात्र, राज्य सरकारने त्यांच्या मागणीसंदर्भात अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. यातच आता राज्यात विधानसभेची निवडणूक जाहीर झालेली आहे. त्यामुळे राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यातच मनोज जरांगे पाटील यांनी आज (२० ऑक्टोबर) अंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाची महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करायचे की नाही? यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे.

विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवार उभे करायचे की नाही? याबाबतचा कौल मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला विचारत त्यांचं मत जाणून घेतलं. त्यानंतर मनोज जरांगे यांनी मोठी घोषणा केली. ‘ज्या ठिकाणी आपले उमेदवार निवडून येतील त्या ठिकाणी उमेदवार द्यायचे. तसेच जो मतदारसंघ राखीव असेल त्या ठिकाणी जर उमेदवार आपल्या विचाराचा असेल मग तो उमेदवार कोणत्या पक्षाचा असेल तरीही त्या उमेदवाराला आपण मदत करायची. मग त्या ठिकाणी आपण उमेदवार उभा करायचा नाही. मात्र, त्या उमेदवाराकडून ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर आपल्याला पाठिंबा देईल असं लिहून घ्यायचं’, अशी घोषणा मनोज जरांगे यांनी जाहीर केली आहे.

आपला उमेदवार कोणत्या मतदारसंघामधून निवडून येऊ शकतो? तसेच कोणत्या मतदारसंघात मुस्लिम-दलीत एकत्र आहेत, ते देखील आपण पाहणार आहोत. मात्र, तुम्ही तोपर्यंत उमेदवारी अर्ज भरा, अर्ज मागे घ्यायच्या दिवशी मी तुम्हाला सांगेल की कोणत्या मतदारसंघामधून कोणाचा अर्ज ठेवायचा? आणि कोणाचा अर्ज मागे घ्यायचा? हे सांगेल. पण तुम्ही आता उमेदवारी अर्ज भरा. मी बरोबर समीकरण जुळवतो, असं म्हणत मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवार उतरवण्याची मोठी घोषणा केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!