Tuesday, December 3, 2024
Homeगुन्हेगारीकनेक्शन ? अकोटच्या प्रवीण लोणकरला सिद्दीकी हत्या प्रकरणी पुणे येथून अटक !

कनेक्शन ? अकोटच्या प्रवीण लोणकरला सिद्दीकी हत्या प्रकरणी पुणे येथून अटक !

अकोला दिव्य ऑनलाईन : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारणारी फेसबुक पोस्ट शुबू लोणकर महाराष्ट्र या पानावरून शेयर केली. पोस्ट करणारा शुबू हा अकोला जिल्ह्याच्या अकोट येथील शुभम रामेश्वर लोणकर आहे का ? या दृष्टीने पोलीस तपास करीत असून, मुंबई पोलिसांनी काल पुणे येथून शुभम लोणकरचा भाऊ प्रवीण लोणकर याला ताब्यात घेतले आहे.पोलिसांनी केलेल्या तपासात शुभम लोणकर आणि त्याचा भाऊ प्रवीण लोणकर हे दोघेही जून महिन्यापासून अकोट सोडून गेले असल्याचे परिसरातील लोकांनी सांगितले होते. मात्र मुंबई पोलिसांनी दोन दिवसांच्या आत प्रवीण लोणकरला ताब्यात घेतल्याने शुबू हाच शुभम आहे की नाही हे उघडकीस येईल.

राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी मुंबई येथे हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेमागे बिश्नोई गँगचा हात असल्याचे समाेर आले. या प्रकरणात ‘शुबू लोणकर महाराष्ट्र’ नामक फेसबुक पानावर पोस्ट शेयर करीत जबाबदारी स्वीकारली आहे. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील प्रसारित पोस्टची सत्यता, या पोस्टच्या मागे कोण आहेत, याचा तपास आणि पडताळणी मुंबई पोलिसांकडून केली जात आहे.

शुबू आणि शुभम लोणकर एकच?

अकोट शहर पोलिसांनी १६ जानेवारी २०२४ रोजी दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान १० आरोपींना अटक केली होती. या १० आरोपींपैकी एक आरोपी शुभम रामेश्वर लोणकर मूळ गाव नेव्हरी बु. ता. अकोट हा होता. शुभम लोणकरला ३० जानेवारी २०२४ रोजी वारजे नगर येथून अटक केली होती. तपासानंतर जामिनावर त्याची सुटका झाली. दरम्यान, काल रात्री बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्याची माहिती मिळताच अकोट पोलिसांनी विचारपूस करण्यासाठी १० पैकी आठ आरोपींना अकोट व अंजनगाव सुर्जी येथून ताब्यात घेतले. दोन आरोपी शुभम लोणकर व त्याचा भाऊ प्रवीण लोणकर यांचे घरी तपासणी केली असता दोघेही आढळून आले नाहीत. ते दोघेही जून महिन्यापासून अकोट सोडून गेल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. गुन्ह्यासंबंधी अकोला पोलीस मुंबई गुन्हे शाखेसोबत संपर्कात असून काल प्रवीण लोणकरला ताब्यात घेतले गेले असल्याने पोस्ट करणारा शुभू नेमका कोण, हे लवकरच स्पष्ट होईल.

गँगस्टर बिश्नोईच्या संपर्कात

गँगस्टर लॉरेंस बिश्नोई आणि त्याचा लहान भाऊ अनमोल बिश्नोई यांच्या संपर्कात शुभम लोणकर होता. त्या दोघांच्या संपर्काच्या अनेक चित्रफित पोलिसांच्या हाती लागल्या होत्या. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी वर्तुळाशी त्याचा चांगला संपर्क असल्याचे समोर आले होते. आता बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणानंतर फेसबुक पोस्ट करणारा शुबू लोणकर आणि शुभम लोणकर हा एकच आहे का? हे आता स्पष्ट होईल असे पोलिसांचे म्हणणे आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!