अकोला दिव्य ऑनलाईन : Baba Siddique Shot Dead Breaking News: महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर काल शनिवार १२ ऑक्टोबर रोजी तीन अज्ञातांनी केलेल्या गोळीबारात सिद्दीकी यांचा मृत्यू झाला. गोळीबारानंतर सिद्दीकी यांना तात्काळ लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र पोटात आणि छातीत गोळ्या लागल्यामुळे त्यांचा मृत्यू ओढवला. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून कर्नेल सिंह आणि धर्मराज कश्यप अशी आरोपींची नावे असल्याची बातमी इंडिया टुडेने दिली आहे. पोलिसांनी रात्री मारेकऱ्यांची चौकशी केली असता त्यांनी आपण बिश्नोई गँगचे सदस्य असल्याचे सांगितले.
एनडीटीव्हीने दोन्ही मारेकऱ्यांच्या पार्श्वभूमीबाबत बातमी दिली आहे. कर्नेल सिंह हा हरियाणाचा असून धर्मराज कश्यप हा उत्तर प्रदेशमध्ये राहणारा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार आरोपी मागच्या २५-३० दिवसांपासून सिद्दीकी यांच्या मागावर होते.
सिद्दीकी यांची हत्या कशी झाली?
दसऱ्याच्या दिवशी खेरवाडी, वांद्रे सिग्नल येथे देवींच्या विसर्जनाची मिरवणूक निघत असते. त्यामुळे या परिसरात दसऱ्याला गर्दी असते. सिद्दीका यांचा मुलगा झिशान सिद्दीकी हा वांद्रे पूर्वचा आमदार आहे. त्याच्या कार्यालयात जाण्यासाठी बाबा सिद्दीकी पायी निघाले होते. यावेळी ६६ वर्षीय सिद्दीकी यांच्यावर रात्री ९.३० वाजता गोळीबार झाला. ९.९ एमएम पिस्तूलमधून सिद्दीकी यांच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या. ज्यामुळे गोळी लागताच सिद्दीकी जमिनीवर कोसळले.
यावेळी सिद्दीकी यांच्या गाडीलाही काही गोळ्या लागल्या. ज्यामुळे तीनहून अधिक गोळ्या झाडल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. तसेच घटनास्थळावरून पोलिसांना आणखी तीन गोळ्यांची काडतुसे मिळाली आहेत. कर्नेल सिंह आणि धर्मराज कश्यपला पोलिसांनी अटक केली असली तिसरा आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे.
गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला देखील संपविण्याचा प्रयत्न केला आहे. सिद्दीकी हे सलमान खान, शाहरुख खान यांचे जवळचे संबंध होते. आरोपींमध्ये एक हरियाणाचा करनैल सिंह आणि दुसरा उत्तर प्रदेशचा धर्मराज कश्यप आहे. या तिघा हल्लेखोरांना बाबा सिद्दीकींच्या जवळचा असलेल्या व्यक्तीकडून माहिती मिळत होती, असा संशय पोलिसांना आहे. हा व्यक्ती बाबा सिद्दीकी कुठे आहेत, किती वाजता येणार आहेत आदी माहिती देत होता.
पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. याबाबतचे वृत्त आजतकने दिले आहे.मुंबई पोलीस सूत्रांनुसार बाबा सिद्दीकींवर हल्ला करण्यापूर्वी तिन्ही आरोपी रिक्षाने घटनास्थळी पोहोचले होते. बाबा सिद्दीकी येण्याची ते वाट पाहत होते. आरोपी गेल्या २५-३० दिवसांपासून त्या भागाची रेकी करत होते. क्राईम ब्रांचला आरोपींनी ते बिश्नोई गँगचे असल्याचे सांगितले आहे.