Saturday, November 23, 2024
Homeसामाजिक९०० विद्यार्थ्यांची दंत तपासणी ! अँड.धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्पाचा उपक्रम

९०० विद्यार्थ्यांची दंत तपासणी ! अँड.धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्पाचा उपक्रम

अकोला दिव्य ऑनलाईन : शाळकरी विद्यार्थ्यांना चाॅकलेट आणि या सारखे पदार्थ खाण्याची सवय असते. मात्र मुलं दातांची योग्य निगा राखत नाही, त्यामुळे दात किडणे, योग्य वाढ न होणे, दातावर दात येणे, फट निर्माण होणे, दात वेडवाकडे होणे, या सारख्या समस्यांनी मुलं त्रस्त असतात. यासाठी अँड.धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्पाने शाळकरी मुलांच्या दातांची मोफत तपासणी उपक्रम सुरु केला आहे.

या उपक्रमात आज बाल शिवाजी प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या ९०० मुलांच्या दातांची तपासणी करण्यात आली. यावेळी शाळेचे अध्यक्ष अविनाश देव, नरेंद्र देशपांडे अँड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्पाचे प्रमुख निलेश देव, दिलीप देशपांडे, जयंत सरदेशपांडे, प्रा.रश्मी देव, डेंटल असोसिएशनचे अध्यक्ष डाॅ.सचिन वानखडे, सचिव डॉ.सुनिल मारवाल, कीर्ती चोपडे, मुख्याध्यापिका संगिता जळमकर राघिनी बक्षी यांची उपस्थिती होती.

मुलांच्या दातांचे आरोग्य तपासणीत डेंटल असोसिएशनने देखील मदत केली असून त्यांची टिम या उपक्रमात विविध शाळांमध्ये दातांचे आरोग्य तपासणी करण्यासाठी पुढाकार घेणार असून डॉ. सचिन वानखडे, डॉ.सुनिल मारवाल, डाॅ.अभिषेक तिडके, डाॅ. तुषार वोरा, डाॅ.पराग इंगोले, डाॅ.झुबेर अहमद, डाॅ.विजय शर्मा, डाॅ.विक्रांत भागवत, डाॅ.दुष्यंत आलिमचंदानी, डॉ.शुभम मानधणे, डॉ.शकुन सराफ, डॉ.रुतुजा वाघ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शाळकरी मुलांसाठी सुरु केलेल्या या उपक्रमात यंदा हजारो विद्यार्थ्यांच्या दातांची तपासणी व उपचाराचा सल्ला देण्यात येणार आहे.

डेंटल चेकअपच्या पहिल्या दिवशी मुलांनी उत्स्फुर्तपणे प्रतिसाद दिला.तर पालकांनी देखील मुलांच्या दाताच्या आरोग्यासाठी अँड.धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प व निलेश देव मित्र मंडळाच्या उपक्रमाचे स्वागत करत सहकार्य केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाल शिवाजी प्राथमिक व माध्यमिक शाळेचे शिक्षकवृंदाचे सहकार्य लाभले. तर निलेश देव, जयंत सरदेशपांडे, दिलीप देशपांडे, रामहरी डांगे, राम उमरेकर, राजेंद्र गुन्नलवार, विजू वाघ, भास्कर बैतवार, ललन मिश्रा, नरेंद्र परदेशी, अजय शास्त्री, मोहन काजळे, बबलू तिवारी, राजू कनोजिया, निलेश पवार, सुधीर मस्के परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!