Friday, October 18, 2024
Homeगुन्हेगारीधक्कादायक ! काेचिंग क्लासेस संचालक 3 भावांचा मुलीवर अत्याचार ; तिघांनाही अटक

धक्कादायक ! काेचिंग क्लासेस संचालक 3 भावांचा मुलीवर अत्याचार ; तिघांनाही अटक

अकोला दिव्य ऑनलाईन : लैंगिक शोषणाचे प्रमाण वाढतं चालले असून, दक्षिण मुंबईत खासगी कोचिंग क्लासेस चालविणाऱ्या तीन भावांनीच १५ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. जवळपास १ वर्षांपासून या मुलीचं हे तीनही नराधम भाऊ शोषण करत होते. प्रकरणी दोन भावांबरोबरच शिक्षकाला रविवारी रात्रीला मुंबई विमानतळाजवळून अटक करण्यात आली.

आरोपी दक्षिण मुंबईत आठवी ते १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग क्लासेस चालवितात. तीनही भावांविरोधात पीडित मुलीचा विनयभंग, बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला. शनिवारी दोघांना अटक केली. या प्रकरणातील आरोपी मोठा भाऊ रविवारी आई-वडिलांसोबत कुलुमनालीहून परतत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याला मुंबई विमानतळाजवळून अटक केली.  हा गुन्हा मध्य मुंबईतील एका पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आला आणि नंतर कोचिंग क्लासेस असलेल्या दक्षिण मुंबईतील पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला.

अशी फुटली गुन्ह्याला वाचा
ही मुलगी २०२२ मध्ये शिकवणीला जात होती. त्यावेळी तिच्यासोबत ३५ ते ४० मुले होती. तिच्या वागण्यातील बदल तिच्या आईला जाणवला. तिने मुलीचे समुपदेशन केले असता, तिने आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती दिली. त्यातून तिघा भावांच्या गुन्हेगारी कृत्याला वाचा फुटली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!