अकोला दिव्य ऑनलाईन : गणेशोत्सव सोहळ्याची अनंत चतुर्दशीला सांगता करण्यात येत असताना, अँड धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्पाच्या वतीने घरोघरातील निर्माल्य संकलित करण्यासाठी अँड धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्पाच्या वतीने कार्यान्वित केलेल्या निर्माल्य रथाच्या माध्यमातून जवळपास ५ टन निर्माल्याचे संकलन झाले असून यापासून खत तयार करण्याला सुरूवात झाली आहे.
उत्सव काळात मोठ्या प्रमाणात फुल आणि झाडांच्या पानाचा वापर होतो. उत्सव संपुष्टात आल्या नंतर निर्माल्य नदीत टाकल्या जाते. परिणामी नदी प्रदुषित होते. विशेषत: श्रावण महिन्यापासुन गणपती उत्सव, हरतालिका, आदी उत्सवात मोठ्या प्रमाणात निर्माल्य तयार होते. ही बाब लक्षात घेवून अकोला येथील निलेश देव मित्र मंडळ आऊअँड धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्पाच्या वतीने दरवर्षी उत्सव काळात निर्माल्य संकलन रथाद्वारे निर्माल्य संकलित केले जाते. गणपती उत्सवा नंतरही या रथाच्या माध्यमातून शहराच्या विविध भागातून निर्माल्य संकलित करण्यात आले. सोमवार व मंगळवार असं दोन दिवस विविध भागात फिरुन निर्माल्य संकलन करण्यात आले.
खत तयार करण्याच्या कामाला सुरुवात
संकलीत झालेल्या निर्माल्यापासून खत आणि धुपबत्ती तयार केली जाणार आहे. या निर्माल्यावर प्रक्रिया करण्याचे काम आज २० संप्टेबर पासून सुरु करण्यात येईल. हे खत शेतकऱ्यांना उपयोगी पडणार आहे, मागील १३ वर्षीपासून निर्माल्य संकलन करुन खत निर्मिती आमच्या वतीने सुरु असुन हे १४ वर्षी आहे अशी माहिती प्रकल्पाचे निलेश देव यांनी दिली.