Sunday, November 10, 2024
Homeअपघातप्रवाशांचा थरकाप ! संपूर्ण एसटी बस जळून खाक रात्रीला मेळघाटात थरार

प्रवाशांचा थरकाप ! संपूर्ण एसटी बस जळून खाक रात्रीला मेळघाटात थरार

अकोला दिव्य ऑनलाईन : परतवाडा ते चिखलदरा मार्गावर मोथानजीक काल रात्री एसटी बसने अचानक पेट घेतल्याने प्रवाशांचा जीवाचा थरकाप उडाला. या दुर्घटनेत एसटी बस संपूर्ण जळाली आहे. मात्र बसमधील प्रवाशांना अत्यंत तातडीने बसमधून उतरविण्‍यात आल्‍यामुळे मोठा अनर्थ टळला. यवतमाळ जिल्‍ह्यातील नेर आगाराची यवतमाळ ते चिखलदरा ही एमएच ४० / एक्‍यू ६१६९ क्रमाकांची महाराष्‍ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस चिखलदरा येथे जात असताना मोथा गावाजवळ घाट वळणावर अचानक एसटी बसच्या चालकाच्या केबीनमधून धूर येऊ लागला. प्रसंगावधान राखत बसमधील प्रवाशांना चालक आणि वाहकाने उतरवले आणि बस रिकामी करण्यात आली. काही मिनिटांत बसने पेट घेतला आणि संपूर्ण बस जळाली.या घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्‍थळी पोहचले. स्‍थानिक नागरिकांच्‍या मदतीने बसची आग विझवण्‍याचे प्रयत्‍न सुरू करण्‍यात आले. एका कंत्राटदाराने टँकर पाठवून आग आटोक्‍यात आणण्‍यास मदत केली. सुमारे दोन तासांच्‍या प्रयत्‍नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्‍यात आले, पण बस संपूर्ण जळाली.

बस चालकाला बसच्‍या समोरच्‍या भागातून धूर येत असल्‍याचे लक्षात आले. त्‍याच क्षणी चालकाने घाटाचा रस्‍ता असूनही प्रसंगावधान राखत बस थांबविली. त्‍याचवेळी बसने पेट घेतला. चालक आणि वाहक यांनी धैर्याने बसमधील प्रवाशांना बाहेर काढले. यावेळी प्रवाशांनी आरडाओरड केल्‍याने परिसरातील नागरिक धावले, परंतु बघण्‍यापलीकडे ते काहीही करू शकत नव्‍हते.

बस पेटल्‍याची माहिती चालकाने आगाराला कळवली. दरम्यान, एसटी बसला आग लागण्याचे कारण समजू शकले नाही.दरम्‍यान, सामाजिक कार्यकर्ते शेख नासीर अब्‍दूल गनी यांनी आपला वैयक्तिक पाण्‍याचा टँकर पाठवून आग आटोक्‍यात आणण्‍यास मदत केली. नोव्‍हेंबर २०२२ मध्‍ये अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर अमरावती शहरापासून २० किलोमीटर दूर पिंपळविहीर गावाजवळ एसटी बसला अचानक आग लागली होती. ही एसटी ३५ प्रवासी घेऊन निघाली होती. यावेळीही चालकाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला होता. नागपूर आगाराची ही एसटी बस होती.

अमरावतीवरून ही बस नागपूरच्या दिशेने रवाना झाली होती. धावत्या एसटी बसच्या इंजिनमध्ये आग लागल्याने ही आग सर्वत्र पसरली. त्यानंतर पाहता पाहता एसटी बस पूर्णपणे जळून खाक झाली होती. एसटी बसला आग लागल्याने अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक तब्बल एक तास ठप्प झाली होती.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!