Sunday, November 24, 2024
HomeUncategorizedजळगाव (जामोद) मध्ये मिरवणूकीवर दगडफेक ! अनेकजण जखमी तर गणेश भक्तांवर पोलिसांची...

जळगाव (जामोद) मध्ये मिरवणूकीवर दगडफेक ! अनेकजण जखमी तर गणेश भक्तांवर पोलिसांची दंडुकेशाही

अकोला दिव्य ऑनलाईन : गणेश मुर्ती विसर्जनाची मिरवणूक सुरू असताना जवळपास अर्धा तासांपर्यंत मिरवणूकीवर केलेल्या दगडफेकीत काही तरुण जखमी झाल्याची घटना काल मंगळवारी घडल्याने जळगाव (जामोद) शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. जळगावतील चौभारा, वायलीवेस या भागातून मिरवणूक मार्गस्थ होत असताना रात्री आठ ते साडे आठच्या दरम्यान अचानक गणेश भक्तांवर दगडफेक सुरू झाल्यावर एकच खळबळ उडाली. मिरवणूकीत सहभागी जवळपास १५ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी जागेवरच मिरवणूक थांबवून ठेवली. तर दरम्यान दगडफेक करणाऱ्यांना तातडीने अटक करण्यात यावी, अशी मागणी करण्या-यांवर पोलिसांनी उलट दांडुके चालवले. यामुळे वातावरण अधिक चिघळले.

या बाबत मिळालेल्या माहितीनुसार शहरातील संत रुपलाल गणेश मंडळाकडून गणेश मुर्ती विसर्जनासाठी काढण्यात आलेली मिरवणूक मुख्य रस्त्यालगत असलेल्या चौभारा, वायलीवेस येथून मिरवणूक निघू लागताच कट्टरवाद्यांनी तुफान दगडफेक सुरू केली. यामध्ये अनेकजण जखमी झाले. गणेश भक्तांनी संयम बाळगून गावात अराजकता निर्माण करणा-यांना अटक करण्याची मागणी केली. तेव्हा उलट पोलिसांनी मागणी करणा-यांवर लाठीचार्ज केला, यात अनेकांच्या डोक्याला दुखापत झाली.

पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये एका गणेशभक्ताचा पाय तुटला आहे. जातीय हिंसाचार व पोलिसांच्या एकतर्फी कारवाईच्या निषेधार्थ जळगाव शहर बंद पुकारण्यात आला. अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी खामगाव वरून एस.आर.पी ची कुमक बोलावून परिस्थितीला नियंत्रित केले.

वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि गणेश भक्त व प्रतिष्ठित नागरिक यांच्यात चर्चा होऊन आज बुधवार १८ सप्टेंबरला दुपारी २ वाजता थांबलेल्या मिरवणूकीला सुरूवात झाली आहे. मात्र मिरवणुकीतील डिजेच्या परवानगीवरुन पोलिसांनी घेतलेल्या भुमिकेमुळे मिरवणूकीचा पुन्हा खोळंबा झाला होता.

.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!