Saturday, November 23, 2024
Homeसामाजिकहा बघा अकोल्यात तब्बल 60 वर्षांपासून विराजमान शिवरायांचा अश्वारूढ पुतळा !

हा बघा अकोल्यात तब्बल 60 वर्षांपासून विराजमान शिवरायांचा अश्वारूढ पुतळा !

अकोला दिव्य ऑनलाईन : अकोल्यातील तब्बल 60 वर्षांपूर्वी अनावरीत केलेला माझ्या शिवरायांचा अश्वारूढ पुतळा…बघा कसा, आमच्या पिढीपासून आत्ताच्या तरुण पिढीलाही आपल्या शौर्य , न्याय अन् कर्तृत्वाच्या कथा ताठ मानेने सांगतोय…!
तसं पाहिलं तर, तत्कालीन अकोला नगर परिषद ‘ क ‘ वर्ग कक्षातील … मात्र, अनेक वर्षं नगराध्यक्षपद भूषविलेले दिवंगत विनयकुमार पाराशर ह्यांच्या नेतृत्वातील दूरदृष्टी असलेली  सारी नेते मंडळी…! तर जिल्ह्याचं नेतृत्व करीत होते. स्व .नानासाहेब वैराळे….
शहरातील रेल्वे स्टेशन समीप शिवाजीपार्कमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा स्थापित कण्याचे एकमुखाने ठरलं… पुतळा निर्मितीसाठी कुठलाच निधी कमी पडू दिला गेला नाही… आणि तब्बल साठ वर्षांपूर्वी म्हणजे १९६४ मध्ये पुतळा पूर्णत्वास आला….

महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक आणि जिल्ह्याचे नेते व मंत्री स्व. नानासाहेब वैराळे आदी मान्यवरांच्या हस्ते माझ्या शिवरायांच्या पूर्णाकृती अश्वारूढ पुतळ्याचे मोठ्या जल्लोषात अनावरण झाले…!
आज ह्या सुवर्ण सोहळ्याला ६० वर्षं झाली…एका क वर्ग नगर परिषदेने उभारलेला असला तरी, आम्हा साऱ्यांना प्रेरणा देत; महाराजांचा पुतळा कुठलीही पडझड न होता ठाम उभा आहे; त्याला तत्कालीन प्रामाणिक व कर्तृत्ववान नेतृत्वाची जोड असल्यामुळेच…!
           आणि राज्य सरकारने कोट्यवधी खर्च करून तामझाम करीत आठ महिन्यांपूर्वी उभारलेला सिंधूदूर्ग येथील राजकोट किल्ल्यावरचा शिवबाचा पुतळा एक वर्ष उलटायच्या आधीच कोसळतो…


ह्याचा अर्थ काय समजायचा…!
तोच की, त्यावेळचं राजकीय नेतृत्व सुज्ञ, समाजाभिमुख अन् जाणतं होतं…! आताशा मात्र …राजकीय नेतृत्व भ्रष्ट, कोत्या वृत्तीचं, उथळ, बेरकी – स्वार्थी असल्यामुळेच… हे असे दुर्दैवी प्रकार घडतात, समाजघातकी प्रसंग उद्भवतात…
जनतेला विस्ताराने न सांगणे लगे…!
कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा…!!!
*प्रा. मधू जाधव , अकोला.*

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!