अकोला दिव्य न्युज ब्युरो : हिंदु धर्माचे रक्षणासाठी आपले बलिदान देणारे सिक्ख धर्माचे नववे गुरू श्री गुरू तेगबहादरजी यांचा शहिदी गुरपुरब (बलीदान दिवस) सालाबाद प्रमाणे या वर्षी शनिवार 2 डिसेंबर 2023 रोजी न्यु राधाकिसन प्लॉट येथील हिन्दु सिक्ख एकताचे प्रतिक गुरूद्वारा श्री गुरु तेगबहादरजी येथे श्रध्दापुर्वक साजरा करण्यात येत आहे. या प्रसंगी सर्व प्रथम श्री गुरूग्रंथ साहिब पाठाची समाप्ती सकाळी 10.30 वाजता गुरूद्वारा मध्ये होईल.
कार्यक्रम हवामान खात्याने दर्शविलेल्या प्रमाणे पाऊस येण्याची शक्यता असल्याने गुरुद्वारा येथील कार्यक्रमानंतर पुढील कार्यक्रम अग्रसेन भवन येथे सकाळी 11.30 वाजता पासुन दुपारी 1.30 वाजतापर्यंत होईल. कार्यक्रमात गुरूद्वारा सिंग सभेचे हजुरीरागी भाई रविंदरसिंग, विजयसिंग, महिंदरसिंग यांचे शबद, किर्तन, प्रवचन होणार आहे. कार्यक्रमाचे समापनप्रसंगी ‘गुरू का लंगर’चे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता गुरूसिंग सभेचे अध्यक्ष रामिंदरसिंग छतवाल तसेच सर्व पदाधिकारी आणि जसवंतसिंग मल्ली, गुरूचरणसिंग बेदी, जगजीतसिंग विरक, इन्दरजीतसिंग गुजराल, प्रकाश सराफ, कैलास हिवराळे, अमरीकसिंग राठोड आदि परिश्रम घेत आहे. सर्व हिन्दु सिक्ख धर्मप्रेमी बांधवानी या प्रसंगी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा.असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे आयोजन समिती तर्फे गुरमितसिंग गोसल यांनी कळविले आहे.