अकोला दिव्य ऑनलाईन : देशाच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा कानडी येथे सार्थक क्रीडा आरोग्य शिक्षण बहुउद्देशीय संस्था अकोला, प्रेरणा बहुउद्देशीय संस्था अकोला व भीमशक्ती सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या 209 विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्याच्या हस्ते स्वेटर वाटप करण्यात आले. ज्ञानप्रकाश विद्यालय कानडी येथील दहावीच्या परीक्षेत उत्तम गुणांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गौरव करून संविधान व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आले. यावेळी आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी लाभ घेतला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष अशोक अमानकर होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून अकोला मेडिकल कॉलेजच्या डीन मिनाक्षी गजभिये, प्रादेशिक उपवनसंरक्षक डॉ.कुमारस्वामी, एसडीओ संदीप अपार, तहसीलदार डॉ यावलीकर, आर.एफ.ओ पवन सदानंद जाधव,आर.एफ.ओ. बी.एम.मेश्राम, आर.एफ.ओ.सुहास मोरे,आर.एफ.ओ.चेतन राठोड, महात्मा फुले विकास महामंडळाचे व्यवस्थापक मिलिंद धांडे,सचिव, प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव व भीमशक्ती पश्चिम विदर्भ प्रमुख दिलीप भोजराज, महिला काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष पुजा काळे, सरपंच उदयसिंग जाधव, मुख्याध्यापक जयसिंग लुटे व शिक्षक कैलास सोळंके, लताबाई सोळंके, शाळा समिती अध्यक्ष सुनीता जाधव प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी संतोष पवार यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन मोनिका लोखंडे, पद्माकर वासनिक, अरुणा संतोष लबडे, संतोष लबडे, गौतम उमाळे, मिलिंद गावंडे, दादाराव वानखेडे, दादाराव रामटेके, लक्ष्मण पवार, संतोष वासनिक, नागेश वासनिक, दिलीप वासनिक, नरेंद्र चव्हाण, नितीन चव्हाण, परमेश्वर रामटेके, रवींद्र गेठे , सतीश दाभाडे, बबलू राऊत, किशोर मेश्राम, गौतम कांबळे, रोशन राठोड, सुरज जामनिक, अंजू वाघेले, सतीश इंगळे ,मोहिनी इंगळे यांनी केले होते शाळेतील शिक्षक पंजाब पांडे, कल्पना तराळे, अर्चना देशमुख, शालिनी मालवे, शितल मदनकर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. यावेळी वीरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन मंगेश नाकात तर आभारप्रदर्शन रुपेश सूर्यवंशी यांनी केले.