अकोला दिव्य ऑनलाईन : जागतिक ‘अवयव दान’ दिनानिमित्त संपूर्ण देशभरात १३ ऑगस्टला अखिल भारतीय मारवाडी महिला संमेलनातर्फे अवयवदान जनजागृति करीता आयोजित स्वरचित भाषण स्पर्धेत अकोला शहरातील राजश्री सोमाणी यांनी राष्ट्रीय स्तरावर तृतीय पुरस्कार पटकाविला. या स्पर्धेत देशभरातील स्पर्धक सहभागी झाले होते. राष्ट्रीय अवयवदान मोहिम निमित्त शरीर दान, नेत्रदान समितीच्या वतीने अवयवदानाचे महत्व या विषयावर जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर स्वरचित भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यास्पर्धेत राजश्री राजेश सोमाणी यांनी सहभाग घेत राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळवून अकोला जिल्ह्यातील मातृशक्तिचा सन्मान वाढवला.
आपल्या भाषणात डोळे, हृदय, किडनी आणि त्वचा इत्यादी अवयव दान करून गरजुंचे जीवन कसे उजळून निघू शकते, यावर सोमाणी यांनी प्रकाश टाकला. देशात दरवर्षी पाच लाख लोकांचा मृत्यू अवयवांच्या कमतरतेमुळे होतो. म्हणून अवयवदान ही काळाची गरज आहे. अवयवदानामुळे अनेकांचे जीवन आपण वाचवू शकते. याबाबत माहिती देऊन प्रत्येकाला अवयवदान करण्यासाठी प्रोत्साहित केले.
अकोला शाखा अध्यक्ष अनिता उपाध्याय, सचिव अंजली उपाध्याय, कोषाध्यक्ष रमा चांडक तसेच अवयवदान व नेत्रदान समिती अकोला प्रमुख सुलोचना सिंगी व छाया खंडेलवालसह ABMM सदस्यांनी राजश्री हिचे या पुरस्कारासाठी अभिनंदन केले. तीने आपल्या यशाचे श्रेय महाराष्ट्र नेत्रदान अवयवदान प्रमुख डॉ राजकुमारी सुरेश जैन व अकोला शाखा अध्यक्ष अनिता उपाध्याय यांना दिले. विशेष म्हणजे यापूर्वी सोमाणी यांनी अवयवदान, नेत्रदान, थॅलेसिमिया यावर जनजागृतीपर स्पर्धेत राष्ट्रीय पुरस्कार पटकावले आहेत. राजश्री सोमाणी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.