अकोला दिव्य ऑनलाईन : विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपने कंबर कसली आहे. शहरात ११ ऑगस्ट राेजी आयाेजित भाजपच्या जिल्हा विस्तारित कार्यकारणीच्या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखखर बावनकुळे दाखल हाेणार आहेत. या बैठकीसाठी सुमारे ५ हजार सदस्यांच्या उपस्थितीचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे.
लाेकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय जनता पार्टीने संघटन बांधणीवर लक्ष केंद्रित केले आहे. पक्षातील जुनेजाणते माजी पदाधिकारी व सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेण्याचे पक्षश्रेष्ठींचे निर्देश आहेत. यापृष्ठभूमिवर भाजपचे जिल्हाध्यक्ष किशाेर मांगटे पाटील यांनी नुकतीच जिल्हाकार्यकारिणीची भाकरी फिरवत अनेक नवीन चेहऱ्यांचा समावेश केला आहे. जिल्हा विस्तारित कार्यकारिणीचा आढावा व त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ११ ऑगस्ट राेजी डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथील दीक्षांत सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
बैठकीच्या उद्घाटनासाटी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खा.अनुप धाेत्रे, आ.डाॅ. संजय कुटे, चैनसुख संचेती, प्रदेश सरचिटणीस आ.रणधीर सावरकर, आ.वसंत खंडेलवाल, आ.हरीश पिंपळे, आ.प्रकाश भारसाकळे उपस्थित राहतील. तसेच समारोपासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.