Wednesday, January 15, 2025
Homeगुन्हेगारीसावधान ! अकोल्याचे सुशील डोडिया यांचे बनावट फेसबुक खाते ! पैशांची होतंय...

सावधान ! अकोल्याचे सुशील डोडिया यांचे बनावट फेसबुक खाते ! पैशांची होतंय मागणी

अकोला दिव्य ऑनलाईन : दिवसागणिक सायबर क्राईमची संख्या वाढत चालली असून, अकोला शहरातील दिव्यांक पब्लिसिटी या जाहिरात कंपनीचे संचालक सुशीलकुमार डोडिया यांचा चक्क फोटो वापरुन, त्यांचे नातेवाईक आणि मित्रमंडळींना पैशांची मागणी केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बनावट फेसबुक खाते सुरु करणा-याने डोडिया यांच्या पुतण्याला ‘गुगल-पे’ वरुन पैसे पाठविण्याची मागणी केली. तेव्हा त्याने समयसूचकता ठेवून, हॅकर्सकडून बॅक खाते व आवश्यक माहिती घेतली. या अनुषंगाने त्यांच्याकडून सायबर क्राईम ब्रांचकडे तक्रार दाखल केली जात आहे.

यासोबतच हॅकर्सने इतरही अनेकांना अशाच प्रकारे पैसे मागितले आहे. पण त्या लोकांनी सरळ डोडिया यांना संपर्क केला. त्यामुळे आर्थिक फसवणूक झाली नाही. हॅकर्सने डोडिया यांचा फोटो वापरत ‘Sushil Sushil’ या नावाने फेसबुकवर खाते सुरु केले आहे. तेव्हा डोडीया यांच्या नावाने पैसाची मागणी करणारा निरोप (मॅसेज) आला तर पैसे पाठवू नका.पण संबंधित व्यक्तीकडून फोन -पे किंवा गुगल-पे अथवा बॅक खाते क्रमांक मागून घ्यावे, ज्यामुळे सायबर क्राईम पोलिसांना त्याचा तातडीने शोध घेणे सोयीचे होईल.
आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करून लोकांची फसवणूक केली जातेय.अनेक प्रकारच्या अॅपमधून अक्षरशः ब्लॅकमेल करून हजारो -लाखो रुपये लुटले जात आहेत.

तरुण-तरुणांनी कोणत्याही अॅपची लिंक ओपन करुन, नसती उठाठेव मागे लावून घेतात.वेळप्रसंगी हजारो रुपये द्यावे लागतात. अनेकांचं फसव्या जाहिरातींना बळी पडून आर्थिक नुकसान होत आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचे आवाहन करणा-या जाहिरातीतून देखील फसवणूक केली जाते. पुणे येथे दोन दिवसांपूर्वी शेअरबाजारात गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून तब्बल २० लाख रुपयांनी फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या बाबत देहू रोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली गेली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!