Wednesday, January 15, 2025
Homeक्रीडामाँ कुश्ती मेरे से जीत गई ! विनेशचा कुस्तीला अलविदा : वाचा...

माँ कुश्ती मेरे से जीत गई ! विनेशचा कुस्तीला अलविदा : वाचा पोस्ट

अकोला दिव्य ऑनलाईन : महिला कुस्तीपटू विनेश फोगटने कुस्तीतून संन्यास घेतला आहे. एक भावनिक पोस्ट लिहून तिने कुस्तीला अलविदा केलं आहे. कुस्ती स्पर्धा आपल्याला आईसारखी आहे. आज मी कुस्तीशी हरले असं म्हणत विनेशने ही भावनिक पोस्ट केली आहे आणि कुस्तीमधून संन्यास घेत असल्याचं जाहीर केलं आहे. ऑलिम्पिकच्या कुस्ती स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत धडक मारणाऱ्या विनेश फोगाटचं वजन १५० ग्रॅमने जास्त भरलं त्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आलं आणि तिचं सुवर्ण पदक जिंकण्याचं स्वप्न भंगलं. ज्यानंतर निराश झालेल्या विनेशने कुस्तीला अलविदा केला.

विनेश फोगटची पोस्ट काय?
“माँ कुश्ती मेरे से जीत गई मैं हार गई माफ़ करना आपका सपना मेरी हिम्मत सब टूट चुके इससे ज़्यादा ताक़त नहीं रही अब। अलविदा कुश्ती २००१-२०२४ आप सबकी हमेशा ऋणी रहूँगी माफी” आई कुस्ती आज तू जिंकलीस आणि मी हरले. मला माफ कर आई, तुझं स्वप्न पूर्ण करण्याची हिंमत आता माझ्यात नाही. माझ्यात आता तितकं बळच उरलं नाही. अलविदा कुस्ती २००१-२०२४ मी तुझी कायमच ऋणी राहिन मला माफ कर. असं म्हणत कुस्तीला आई समान मानत विनेश फोगाटने कुस्तीतून संन्यास घेतला आहे.

अंतिम फेरीत जाऊनही वजनामुळे अपात्र ठरली विनेश
ऑलिम्पिकच्या स्पर्धेत विनेश फोगटनं तिच्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध उपांत्य फेरीचा सामना ५-० च्या फरकानं जिंकला. प्रतिस्पर्ध्यासाठी तिनं साधा एक गुणही सोडला नव्हता. त्यावेळी विनेशची देहबोली प्रत्येक भारतीयाला जणू सांगत होती की, तयारी करा मी सुवर्ण पदक आणते आहे. त्यामुळे विनेश गोल्ड आणणारच ही खात्री जवळपास प्रत्येक भारतीयाला वाटलीच. ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारी विनेश पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली. पण, १५० ग्रॅम वजन पात्र ठरलं आणि विनेशला सुवर्ण पदकाच्या सामन्यासाठी अपात्र ठरवण्यात आलं. तिला लढायचं होतं, पण मैदानात येण्यापूर्वीच ती अपात्र ठरली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!