अकोला दिव्य ऑनलाईन : देशभरात 12 इंडस्ट्रियल पार्क उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. पण या आधी घोषणा केलेल्या पैकी किती स्मार्ट सिटी पूर्ण झाल्या ? गरिबासाठीची एक कोटी घरांची योजनाही शुध्द धुळफेक आहे. 25 हजार तरुणांना साडेसात लाखापर्यंत पंधरा वर्षे राज्यांना बीनव्याज अर्थ पुरवठाच्या नवीन घोषणे काही खरं नाही. एकंदरीत हा अर्थसंकल्प सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय करणारा अर्थसंकल्प कराआहे, असं मत अर्थतज्ज्ञ प्रा. प्रकाश डवले यांनी व्यक्त केले.
कॅन्सरची औषधे स्वस्त होणार ? परंतु सर्व औषधी स्वस्त का नाही? इंटर्नशिप योजनेअंतर्गत विविध कंपन्यांवर शासन अवलंबून राहून योजना काढत आहे त्याचा परिणाम होईल असे वाटत नाही.
बिहार व आंध्रप्रदेश प्रमाणे इतर राज्यांना पाहिजे त्या प्रमाणात निधी देण्यात आलेला नाही. आंध्रप्रदेश मधील अमरावतीला 15 हजार कोटी रुपयांची केलेली तरतूद ही तेलुगू देशम पक्षाने समर्थन काढू नये म्हणून आहे. मागील वर्षी सात लाखापर्यंत टॅक्स फ्री असलेले उत्पन्न यावर्षी तीन लाखावर आणण्यात आलेले आहे हा सर्व सामान्यांवर अन्याय वाटतो. केंद्रामधील सहकारी पक्षांना खुश करणारे बजेट आहे.सोने व मोबाईल स्वस्त करून श्रीमंतांना उपहार दिला.मात्र पेट्रोल, गॅस आणि डिझलचे भाव कमी करण्यासाठी विशेष लक्ष देण्यात आले नाही. असे प्रा.डवले यांनी सांगितले.