अकोला दिव्य ऑनलाईन : लहान वयापासूनच आध्यात्मिक संस्कार झाले, तर भावी पिढीचे भविष्य निश्चितच उज्वल होईल, हा दृढ विश्वास ठेवून ‘समर्थ एज्युकेशन संस्था’ यासाठी सदैव पुढाकार घेते.आषाढी एकादशीचा सोहळा बघून नकळत ओठांवर ओळी येतात, ‘आता कशाला जाता दूर, समर्थ स्कूलमध्ये अवतरले ‘पंढरपूर’ असे उद्गार समर्थ एज्युकेशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. नितीन बाठे यांनी काढले.
श्री समर्थ पब्लिक स्कूलमध्ये देवशनी आषाढी एकादशीनिमित्त आयोजित पालखी सोहळा, रिंगण, भक्तीगीत मैफिल, फुगडी, नृत्य आदी कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते व्यासपीठावर संस्थेच्या संस्थापक संचालक प्रा.जयश्री बाठे, प्रा.राजेश बाठे, प्रा. किशोर कोरपे, डॉ.जी.सी.राव, प्रा.योगेश जोशी, प्राचार्य सुवर्णा गुप्ता, प्रा.प्रदीप अवचार, प्राचार्य अश्विनी थानवी, प्राचार्य मुग्धा कळमकर उपस्थित होते.
संस्थेच्या आधारस्तंभ सुमनताई बाठे व प्रा.जयश्री बाठे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, महाराष्ट्राची भूमी ही पावन असून ही संतांची भूमी असून त्यांनीअजरामर अभंगरचना लिहून मोठ्या प्रमाणात जागृती करून, प्रत्येक पिढीला समृध्दता प्रदान केली.अनेक अभंगांचे दाखले देत त्यांनी मुलांच्या मनावर संस्कार बिंबविण्यासाठी प्रत्येक शिक्षकाने पुढे यायला हवे, असे आवाहन याप्रसंगी केले.
समारंभामध्ये स्नेहा वैराळे, श्रेया हिवरकर,अथर्व नागरगोजे,ध्रुव शर्मा,आतिश सोसे, श्रीनीत कुळकर्णी, रेयांश खंडेलवाल,ध्रुव गावंडे, सोपान ढोरे, वंशिका कटारिया, राधे लंजूरकर, परिधि देशपांडे, अदीश्री सोलंके या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गायन व अभिनय करुन सर्वांची मने जिंकली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.