Friday, October 18, 2024
Homeशैक्षणिकहोलीक्रॉस शाळेच्या संचालकांचा मनमानी कारभार ! तात्काळ कारवाई करा

होलीक्रॉस शाळेच्या संचालकांचा मनमानी कारभार ! तात्काळ कारवाई करा

अकोला दिव्य ऑनलाईन : अकोला शहरातील अल्पसंख्याक दर्जा असलेल्या होली क्रॉस कॉन्व्हेन्ट व माध्यमिक शाळा संचालित करणा-या व्यवस्थापनाचा मनमानी पद्धतीने कारभार सुरू असून अकोला जिल्हा परिषदेचे या शाळेला छुपा पाठिंबा आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. शाळा प्रशासन पालकांची अक्षरशः लूट करत आहेत. अवाजवी शैक्षणिक शुल्क, डोनेशन व वेगवेगळ्या कारणांसाठी विनापावती पैसे उकळले जात आहेत. प्रत्येक वर्गात मंजूर संख्येने अधिक विद्यार्थी बसवण्यात येत आहे. अक्षरशः विद्यार्थ्यांना कोंबले जात आहे. असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे.

विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी मुबलक शिक्षकवर्ग नाहीत. पालकांनी विचारना केली तर त्यांनाच उलट दमदाटी केली जाते.याबाबत मनसेतर्फे वारंवार तक्रारी करून सुद्धा शिक्षणाधिकारी हेतुपुरस्पर कानाडोळा करत आहेत.असा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आला आहे. होलीक्रॉस शाळेच्या संचालकांच्या मनमानी कारभाराची स्वतंत्र समिती गठीत करुन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मनसेने केली आहे. याबाबत आज मंगळवार ९ जुलै रोजी अकोला जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना आज निवेदन देण्यात आले.

यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी उपस्थित नसल्यामुळे मनसे पदाधिकारी आक्रमक झाले होते. शेवटी जिल्हा परिषद विस्तार अधिकारी यांनी निवेदन स्वीकारले. होलीक्रॉस शाळा संचालकांच्या मनमानी कारभाराची तात्काळ चौकशी करुन कारवाई झाली नाही. तर या विरोधात लवकरच मनसे उग्र आंदोलन करेल असा इशारा जि.प प्रशासनाला यावेळी देण्यात आला.

निवेदन देताना मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे, शहर संघटक अरविंद शुक्ला, उपजिल्हाध्यक्ष सतीश फाले, शहर अध्यक्ष सौरभ भगत, जिल्हा सचिव ललित यावलकर, विधी विभागाचे उपाध्यक्ष अँड.नंदकिशोर शेळके, विधी विभाग जिल्हाध्यक्ष अँड.संतोष गोळे, राजेश पिंजरकर, रुपेश तायडे, मोहन मते, सोनू अवचार, चंदू अग्रवाल, प्रवीण मस्तुद, अभिषेक गौतम, दीपक खेतान आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!