Thursday, January 2, 2025
Homeताज्या घडामोडीअकोल्यातील जवानाला २४ व्या वर्षी वीरमरण : महिन्यापूर्वी झालं होतं लग्न

अकोल्यातील जवानाला २४ व्या वर्षी वीरमरण : महिन्यापूर्वी झालं होतं लग्न

अकोला दिव्य ऑनलाईन : जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात शनिवारी रात्रीला भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झाले असून दहशतवाद्यांशी लढताना अकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकरे येथील प्रवीण जंजाळ या २४ वर्षीय जवानाने वीरमरण पत्करले आहे. ही बातमी मिळाल्यानंतर जंजाळ यांच्या मोरगाव भाकरे आणि अकोला जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. प्रवीण जंजाळ २०२२ साली सैन्य दलात भरती झाल्याचे सांगितले जाते. चार महिन्यांपूर्वी जंजाळ रजेवर आले होते आणि मागच्या महिन्यात अर्थात जुन २०२४ मध्ये त्यांचे लग्न झाले होते. लग्न झाल्यावर १५ दिवसांपूर्वी ते पुन्हा सेवेत रुजू झाले आणि काल ते देशासाठी शहीद झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, मोठा भाऊ असा परिवार आहे.जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी मोदेरगाम गावात पहिली चकमक झाली. त्यानंतर सायंकाळी फ्रिसल या गावी दुसरी चकमक झाली. पहिल्या चकमकीत भारतीय जवानांना गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येते.

शोधमोहिम सुरू असताना सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवादी आमनेसामने आल्यानंतर चकमक सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही गावात असलेले दहशतवादी घरांमध्ये लपून बसले होते. तिथूनच ते गोळीबार करत होते. एका चकमकीत सुरक्षा दलाने संबंधित घराला स्फोटकांनी उडवून दिले. ज्यात दहशतवाद्यांचा खात्मा झाला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!