अकोला दिव्य ऑनलाईन : अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघ पुणे यांनी पुकारलेल्या एक दिवसीय धरणे आंदोलनाच्या अनुषंगाने अकोला जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने अकोला जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज मंगळवार दि. २ जुन रोजी सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत धरणे आंदोलन करण्यात आले. अकोला जिल्हाध्यक्ष महेश शर्मा, महानगराध्यक्ष योगेश अग्रवाल, जिल्हा सचिव अमोल सातपुते, जिल्हा कार्याध्यक्ष कैलास महाजन, सुभाष शहा यांच्या नेतृत्वात आंदोलन पार पडले. आंदोलनाला कॉंग्रेस पक्षाचे विवेक पारसकर, प्रकाश तायडे, इंटक काँग्रेसचे नेते प्रदीप वखारीया, शिवसेना उबाठा जिल्हा प्रमुख गोपाल दातकर, शिवसेना उबाठा महानगर प्रमुख राजेश मिश्रा, शिवसेना नेते तरुण बगेरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे पंकज गावंडे यांनी भेट देऊन पाठिंबा दिला. आंदोलन यशस्वी करण्यासाठी रितुराज शुक्ला, विकी शुक्ला, शेख जावेद, मोहम्मद शोएब, राहुल रुंगठा, दाऊदखान राही, फरहान, रवींद्र माने, राजेंद्र शिरे, रमाकांत धनस्कार, सुंदर लुल्ला, लक्ष्मणराव कडू, विलास पारधी, राजेश चौधरी, अशोक तुपे, कैलास शर्मा, संजय गुप्ता यांनी परिश्रम घेतले.
आंदोलनामध्ये अकोला महानगरातील सुरेंद्र सपकाळ, दिलीप अग्रवाल, भूषण सातपुते, वैभव पाटोळे, सूर्यकांत पुसदकर ,कपिल रामटेके, मनोज दाभाडे, आकाश वानखडे, सिद्धार्थ मुंडे, मोहन शर्मा, पंकज अवस्थी, गजानन घुले, संजय थावरानी, श्यामकुमार पांडे, उल्हास कारंडे, अतुल कमलाकर, मोहम्मद शकिर मोहम्मद रोशन, मोहम्मद फरहान, मजीद दोसानी , रवि जोशी, शेवळकर, रमेश नाईक, जयंत मोहोळ, शकुंतलाबाई नाकट उपस्थित होते.