अकोला दिव्य ऑनलाईन : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ जर्नालिझम अँड सोशल वर्क महाविद्यालय अकोलातर्फे वर्षा महोत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठाण, प्रबोधन नगर, खडकी येथील सभागृहात हा कार्यक्रम सोमवार सकाळी ११ वाजता होत असून यावेळी आंतर महाविद्यालय विविध सांस्कृतिक व नृत्य स्पर्धा पार पडतील. याशिवाय
कोणत्याही शाखेतील १२ वी वर्गात व कोणत्याही शाखेतील पदवी प्राप्त ज्यांना ६५ टक्केपेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहे अश्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि राज्य व राष्ट्रीय पातळीवर सहभागी क्रिडा स्पर्धकांचा सत्कार जिल्हाधिकारी अजित कुंभार व संस्था अध्यक्ष प्रा. मुकुंद भारसाकळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येईल. सत्कारमूर्ती म्हणून सामाजिक कार्यकर्ते पंकज जायले आणि माजी आमदार तुकाराम बिडकर उपस्थित राहणार आहेत.
राज्य व राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेत सहभागी विद्यार्थी तसेच आर्थीक परिस्थीती जेमतेम असलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांची निवड दत्तक योजनेमध्ये शिक्षण, निवास, स्पर्धेपरिक्षा पुर्वतयारी बाबतचा सर्व शैक्षणीक खर्च संस्था करणार आहे. निवड समितीव्दारा २० विद्यार्थ्याची निवड करण्यात येईल. विशेष दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रवेशाकरिता राखीव जागा आणि विशेष शिष्यवृत्ती रोख स्वरूपात दिली जाईल. लाभार्थी विद्यार्थ्यांनी शैक्षणीक
प्रमाणपत्रास सकाळी ११ वाजता हजर राहावे असे आवाहन महाविद्यालय प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहिती करीता प्रा. जया वझिरे यांच्या ९८३४२४९४१७ या मोबाईल व्हॉटअप क्रमांकावर संपर्क साधावा.