अकोला दिव्य न्युज ब्युरो : शहरातील मालमत्ताधारकांकडून मालमत्ताकराची वसूली ही खाजगी कंपनी स्वाती इंडस्ट्रीकडून दादागिरीने करून घेत आहे. मात्र अकोलेकरांच्या आरोग्याकडे मनपाचे साफ दुर्लक्ष आहे, असा आरोप करत माजी महापौर व प्रदेश कांग्रेस कमिटी सचिव मदन भरगड यांनी मनपाच्या कोणत्याही अधिकारीने मोर्णा काठावर १ तास उभं राहून दाखविल्यास त्यांना १ लाख रुपयाचे बक्षीस देणार असे आव्हान केले. अकोल्यात धूळीचे प्रमाण खुप जास्त वाढल्यामुळे शहराच्या हवेतील गुणवत्ता खुप खराब झाली आहे.याबाबतीत मुंबई नंतर अकोला शहरचा दुसरा क्रंमाक असून याचा नागरिकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे, पण अकोला मनपाचे याकड़े पूर्णपणे दुर्लक्ष आहे. अकोला शहराची वाढलेली खराब गुणवत्ता कमी करण्यास मनपा कोणतेही प्रयत्न करतांना दिसत नाही. असे भरगड यांनी सांगितले.
शहराच्या मध्यभागी असलेल्या मोर्णा नदीमधील जलकुंभीने डासांचा प्रादुर्भाव खुप जास्त वाढलेला आहे. नदिच्याकाठावरील खोलेश्वर, राजपूतपूरा, कमला नेहरूनगर, अनिकट, गीतानगर, शालिनी व रीगल टॉकीजच्या मागे, निमवाड़ी, गुलजारपूरा या वस्त्यातील व वस्त्याला लागून असलेल्या अनेक वस्त्यामधे राहणारे लाखो नागरिक मच्छरामुळे त्रस्त झाले आहेत.संध्याकाळच्या वेळेस या वस्त्यामधे मनपाचा कोणत्याही अधिकाऱ्यांनी १ तास उभं राहून दाखविल्यास त्यांना १ लाख रुपयाचे बक्षीस देणार असे आव्हान भरगड यांनी केले.
मच्छर व धुळीमुळे शहरात मलेरिया, डेंग्यू, चीकनगुनिया सारख्या आजारांचे प्रमाण अतोनात वाढले आहे. नागरिकांचे आरोग्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या मनपाला अकोलेकरांकडून कराची वसूली करण्याचा नैतिक अधिकारच नाही.मनपा जेव्हा कर वसूल करीत आहे. तेंव्हा प्राथमिक सुविधा पुरविण्याची जवाबदारीही मनपाची आहे.पण मनपा आपले कर्तव्य विसरली आहे.यासाठी युध्दस्तरावर
मनपाने योग्य ती कार्यवाही लवकर सुरु करावी, अन्यथा मनपा विरुद्ध जनआंदोलन सुरु करण्यात येणार आहे, असा इशारा माजी महापौर मदन भरगड यांनी दिला आहे.