अकोला दिव्य ऑनलाईन : समाजाच्या सुख: दु:खात सक्रिय सहभाग घेऊन यथोचित सहकार्य करणे, तसेच समाजातील व्यक्तीच्या निधनाची माहिती पुरवणे, त्या कुटुंबातील प्रथेप्रमाणे मृतक व्यक्तीचा अंत्यसंस्कार पार पाडणे, नेत्रदानासाठी प्रोत्साहन इत्यादी सामाजिक कार्यात निरपेक्षपणे सेवा देणारे प्रा.डॉ.रमण हेडा यांना सेवाव्रत्ती म्हणून सन्मानित करण्यात आले.
माहेश्वरी भवनात आयोजित महेश नवमी सोहळ्यात ज्येष्ठ उद्योजक तथा गीता परिवाराचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ संजय मालपाणी यांच्या हस्ते समाज ट्रस्टचे ट्रस्टी रमण हेडा यांचा शाल, श्रीफ़ळ, स्मृतिचिन्ह प्रदान करून गौरव करण्यात आला. माहेश्वरी समाज ट्रस्टचे अध्यक्ष विजय पनपालिया यांच्या अध्यक्षतेत संपन्न झालेल्या सोहळ्यात समाज ट्रस्टचे प्रधानमंत्री विजयकुमार राठी, उत्सव प्रमुख शांतीलाल भाला, महिला मंडळाच्या अध्यक्ष शिल्पा चांडक, प्रगती मंडळाचे अध्यक्ष आनंद डागा, नवयुवती मंडळाच्या अध्यक्ष सावी झंवर, नागरिक प्रकोष्ठचे अध्यक्ष प्रा. गोपीकिसन कासट, महिला प्रकोष्ठच्या अध्यक्ष सरोज लढ्ढा उपस्थित होते. या सन्मानाबद्दल प्रा.डॉ. हेडा यांचे अकोला जिल्हा माहेश्वरी सभेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
स्थानीय माहेश्वरी महासभेच्या कार्यालयात जिल्हा सभेचे अध्यक्ष, रवींद्र भन्साली यांच्या अध्यक्षतेत संपन्न अभिनंदन सोहळ्यात सभेचे प्रदेश उपाध्यक्ष नरेश बियाणी, युवा प्रदेश अध्यक्ष सागर लोहिया, जिल्हा सचिव पुरुषोत्तम पनपालीया, संघटन मंत्री रमणभाई लाहोटी, प्रचार मंत्री राजेश सोमाणी, अर्थमंत्री अनिल मालू, वरिष्ठ उपाध्यक्ष शैलेश तोष्णीवाल, महेश नवमी सहयोजक संदीप बुब, दीपक राठी, जगदीश मुंदडा, अनूप राठी, प्रा डॉ राम बाहेती, प्रा.डॉ. महेश मुंदड़ा उपस्थित होते. यावेळी भंसाली यांनी विदर्भ प्रदेश संगठनचे सारथी अभियानचे प्रदेश संयोजक प्रा. डॉ. हेडा यांच्या सेवा कार्याची प्रशंसा करीत या सन्मानाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
करोना काळात मृतकाची अंतेष्टी सेवा करीत, विदर्भ प्रदेश संगठनचे मावळते प्रदेश सचिव प्रा.डॉ.हेडा यांनी आपल्या सेवा कार्याची समाजाला जाणीव करून दिली. समाजात सातत्याने पुढाकार घेऊन समरसतेला प्रोत्साहन देतात. सामाजिक परंपरा व रितीरिवाजाला धरून समाजातील अंतिम संस्कार प्रक्रियेमध्ये कार्य करीत मृतकाचे मृत्यु प्रमाणपत्र मृतकाच्या कुटुंबापर्यंत आणून देण्याचे कार्य करीत असतात. प्रा.डॉ.हेडा यांच्या या अभिनंदन प्रसंगी अकोला जिल्हा माहेश्वरी सभेचे समस्त पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.