अकोला दिव्य ऑनलाईन : तब्बल १९२ वर्षांचा समृद्ध वारसा आणि उत्कृष्टतेची बांधिलकी असलेल्या ‘पीएनजी ज्वेलर्स’तर्फे ग्राहकांची वाढती मागणी आणि विदर्भातील भरघोस प्रतिसादानंतर अकोला येथील रतनलाल प्लॉट एरिया, नेकलेस रोड वर नवीन दालन सुरू करण्यात आले आहे.
येथे विस्तारित अकोल्यातील या नवीन दालनासह महाराष्ट्रात ‘पीएनजी ज्वेलर्स’चा विस्तार आणखी मजबूत झाला आहे. २० जून २०२४ रोजी या ४३०० चौरस फूट लार्ज फॉरमॅट दालनाचे भव्य उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रख्यात अभिनेते स्वप्नील जोशी, सन्माननीय अतिथी म्हणून अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे, इतर मान्यवर आणि पीएनजी ज्वेलर्स परिवारातील सदस्य उपस्थित होते.
दालनाच्या उद्घाटनाचा एक भाग म्हणून ‘पीएनजी ज्वेलर्स’तर्फे ग्राहकांना सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर २० टक्के सवलत आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या घडणावळीवर १०० टक्के सवलत दिली जाणार आहे. ही ऑफर ४ जुलै २०२४ पर्यंत अकोला येथील नवीन दालनात सुरू राहणार आहे. या नवीन दालनात सोने, चांदी, हिरे आणि प्लॅटिनम दागिन्यांसह ‘पीएनजी ज्वेलर्स’ दालनामध्ये उपलब्ध असलेल्या उत्पादनांची संपूर्ण श्रेणी उपलब्ध करण्यात आली असून ग्राहकांना उत्कृष्ट कारागिरी केलेल्या डिझाइनचे विविध दागिने निवडता येणार आहेत.
‘पीएनजी ज्वेलर्स’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ म्हणाले की, अकोल्यातील नवीन दालन ग्राहकांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा देण्यासाठी व महाराष्ट्रातील सर्व ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठीच्या आमच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. आमचे सर्वोत्तम दागिने आणि वैयक्तिक सेवा अकोल्यातील नागरिकांसाठी आणण्यास आणि त्यांच्या खास क्षणांचा एक भाग होण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. गुणवत्ता, विश्वास आणि ग्राहकांचे समाधान यासाठी आम्ही कटिबद्ध असून या दालनाच्या माध्यमातून आमची कलाकुसर अधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याचा आम्हाला आनंद आहे.
अभिनेते स्वप्नील जोशी म्हणाले की, पीएनजी ज्वेलर्स या ब्रँडशी जोडल्याचा मला आनंद आहे. त्यांचा समृद्ध वारसा हा नेहमीच महाराष्ट्रीयन संस्कृती आणि परंपरा साजरी करत आले आहे. या ब्रँडशी माझा दृढ संबंध असल्याने अकोला येथील दालनाच्या उद्घाटन कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी उत्सुक होतो. ब्रँडच्या विस्ताराचा साक्षीदार होताना खूप आनंद होत आहे. मला विश्वास आहे की दागिन्यांची आवड असणाऱ्यांसाठी हे दालन प्रथम पसंतीचे ठिकाण बनेल.
अकोला हे पूर्व महाराष्ट्रातील तिसरे सर्वात मोठे शहर आहे. अकोल्यातील ‘पीएनजी ज्वेलर्स’ दालन हे शहराच्या सुसंस्कृत रहिवाशांशी जोडले गेले असून, येथे उत्कृष्ट कारागिरीची नेहमीच प्रशंसा केली जाते.