अकोला दिव्य ऑनलाईन : हातगाडीवर भाजीपाला, फळे तसेच विविध वस्तूंची विक्री करणाऱ्यांना बार्शिटाकळी नगर पंचायतचे पथ विक्रेता प्रमाणपत्राचे वितरण वंचित बहुजन युवा आघाडीतर्फे करण्यात आले. पथविक्रेता (उपजिविका,संरक्षण व पथविक्री विनिमय) अधिनियम २०१४ नुसार बार्शीटाकळी नगर पंचायत मधील पथ विक्रेत्यांना नोंदणीकृत करण्यासाठी वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा आघाडीचे पदाधिकारी मागील वर्षभरापासून बार्शीटाकळी नगर पंचायत अधिकारी व कर्मचारी यांच्याकडे पाठपुरावा करत होते.
लोकसभा निवडणूक आचारसंहिता संपुष्टात आल्याने वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, तालुका अध्यक्ष अमोल जामनीक, प्रसिध्दी प्रमुख सचिन शिराळे, कोषाध्यक्ष दादाराव पवार, भारत निकोशे यांच्या हस्ते पथ विक्रेत्यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. या नोंदणीमुळे व्यवसायाला संरक्षण मिळणार असल्याचे सांगून विक्रेत्यांनी यासाठी समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाचे आयोजन तालुकाध्यक्ष अमोल जामनिक, तालुका महासचिव अक्षय राठोड, प्रसिद्ध प्रमुख रक्षक जाधव, भूषण सरकटे व वंचित बहुजन युवा आघाडीतर्फे करण्यात आले होते.