Sunday, December 22, 2024
Homeअपघातअकोल्यातील 2 युवकांचा महामार्गवर अपघातात मृत्यू: रस्त्यावरचे तडे कारणीभूत

अकोल्यातील 2 युवकांचा महामार्गवर अपघातात मृत्यू: रस्त्यावरचे तडे कारणीभूत

akola road accident : अकोला दिव्य न्युज ब्युरो : अकोला शहरात अपघाताची मालिका सुरूच असून, अकोला खामगाव राष्ट्रीय महामार्गावरील अकोला शहरालगत असलेल्या टाटा मोटर्स जवळ रस्त्याचा जाईंड निघून तयार झालेल्या लांब खाचेत दुचाकीचे चाक फसून दुचाकी स्लिप झाली आणि वाहनस्वार व मागे बसलेला युवक त्याच वेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या टिप्परच्या मागच्या चाकाखाली सापडले. बघता क्षणीच दोघांचा घटनास्थळी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आले.

राष्ट्रीय महामार्गावर सिमेंटच्या जाईंड दिलेल्या ठिकाणी मोठ्या खाच पडल्याने हा अपघात झाला असल्याचे दिसून येते. दोन निष्पाप जीवांचा बळी केल्यानंतर तरी राष्ट्रीय महामार्ग विभागाने तातडीने संबंधित कंत्राटदार कंपनीकडून डागडूजी करुन रस्ता दुरुस्त करावा, अन्यथा अपघाताचे प्रमाण वाढत जाऊन लोकांचा जीव धोक्यात आल्यावीना राहणार नाही.

शहरालगत असलेल्या टाटा मोटर्स जवळ झालेल्या या अपघातात शिवणी येथील राजेंद्र महाले (वय ३०) आणि उमरी येथील सचिन जुनारे (वय३२) या दोन तरुणांचा मृत्यू झाला. उमरी आणि शिवणी भागात शोककळा पसरली आहे. मागील एक महिन्यापासून सुरू असलेल्या अपघातामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. आता राष्ट्रीय महामार्ग विभागाने लोकांचा संयम सुटण्याची वाट बघू नये.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!