अकोला दिव्य न्युज ब्युरो : आपल्या दुचाकीवरून लिफ्ट देण्याच्या बहाण्याने नेऊन एका शेतात ७८ वर्षांच्या वृद्धेवर लैंगिक अत्याचार करणारा फरार आरोपी राहुल मोरेला अखेर पोलिसांनी अटक केली आहे.बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीत दाळंबी येथील एका वयोवृध्द महिलेच्या तक्रारीनुसार २८ मे रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास अकोला येथून एसटी बसने कोळंबी फाट्यावर उतरली. तेथून खाजगी लक्झरी बसने दाळंबी येथे जाण्यास निघाली. गावाचे पुलाच्या अलीकडे वृद्ध महिला बसमधून खाली उतरली आणि तेथून पायी जात असताना समोरून दोन मोटारसायकलवर तिघे जण आले. एका मोटारसायकलवरील दोन इसमांनी त्यांच्या तोंडाला रूमाल बांधुन व एका मोटारसायकलवरील इसमाने काही बांधलेले नव्हते. त्या तिघांनी वृद्ध महिलेस उचलून रोडचे बाजुचे निंबाच्या शेतात आणले व तोंडाला कापड बांधलेले दोन इसम तेथून निघून गेले. त्या ठिकाणी हजर असलेल्या तिसऱ्या युवकाने वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार केला. तसेच कोणाला सांगितले तर मारून टाकणार अशी धमकी दिली.
त्यानंतर त्याने तेथून त्याचे सोबत आलेल्या दोन इसमांना फोन लावला असता ते आले नाही.नंतर आरोपी युवक वृद्धेला मारण्याकरीता दगड शोधत असता, वृद्ध महिला तेथून पळून गेली. दरम्यान तिला तिच्या गावातील धर्मा शिंदे व आणखी एक इसम दाळंबी गावाकडे पायी जाताना दिसले. यावेळी वृद्धेने त्यांना आपबिती सांगत, दोघांना आरोपीस पकडा असे म्हटले. गावातील दोघांनीही आरोपी युवकाचा पाठलाग केला. परंतु आरोपी मोटारसायकलवर पळून गेला. त्यानंतर गावातील इसमांनी वृद्धेला तिच्या सोडून दिले. दुसऱ्या दिवशी वृद्धेने बोरगाव मंजू पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपासात घेतला. घटनेचे गांर्भीर्य ओळखून पोलिस अधीक्षक बच्चनसिंह यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी मुर्तिजापूर, बोरगाव मंजू पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार केले.
वेगवेगळे पथक सीसीटीव्ही फुटेज तपासले. पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी व आरोपीने गुन्ह्यात वापरलेले वाहन निष्पन्न करून आरोपी राहूल अर्जुन मोरे(२४) रा. ग्राम शेलोडी ता. खामगाव जि. बुलढाणा याला ताब्यात घेवून विचारपूस केली असता, त्याने गुन्ह्याची कबूली दिली. त्याने एकट्याने गुन्हा केल्याची कबुली दिली.