अकोला दिव्य न्युज ब्युरो : बाबासाहेब उटांगळे इंग्लिश हायस्कूलचा इयत्ता दहावीचा निकाल १०० टक्के लागला. दरवर्षी प्रमाणे यंदाही हायस्कूलने आपल्या यशाची परंपरा कायम ठेवली. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये महाविद्यालयातून प्रथम येण्याचा बहुमान अर्पिता सुनील घोगरे या विद्यार्थिनीने ९३.४० टक्के गुण प्राप्त करत मिळवला. द्वितीय स्थानावर गौतमी अशोक बनसोड (९१.८०) तर तृतीय स्थानावर सुहाना उस्मान परसुवाले (८७.२०) हिने प्राप्त केला. अन्य विद्यार्थी विशेष प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले. शाळेत वर्षभर हस्ताक्षर स्पर्धेसह विविध विशेष उपक्रम राबवण्यात येतात. तीन वेळा सराव परीक्षा घेण्यात आली. सोडवण्यात आलेल्या उत्तरपत्रिकांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येते.वेळोवेळी विषय तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येते.
दरम्यान संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतीश उटांगळे, सचिव स्नेहलउटांगळे व सर्व कार्यकारी मंडळ, मुख्याध्यापक जी. एम. जोशी, कॉलेजचे प्राचार्य आनंद डाबेराव, उपमुख्याधापक विशाल नबापुरेयांनी विद्यार्थ्यांचा सत्कार केल्याचे शाळेचे प्रसिद्धी प्रमुख विशाल सिरसाट यांनी कळवले आहे.