Sunday, January 5, 2025
Homeशैक्षणिकदहावीच्या परीक्षेत माही महेश चौधरी शाळेतून पहिली ! इंजिनीअरिंगमध्ये भविष्य घडवायचे आहे

दहावीच्या परीक्षेत माही महेश चौधरी शाळेतून पहिली ! इंजिनीअरिंगमध्ये भविष्य घडवायचे आहे

अकोला दिव्य न्युज ब्युरो : दहावीच्या परीक्षेच्या कालच जाहीर करण्यात आलेल्या निकालात निकालात माही महेश चौधरी या विद्यार्थिनीने १०० टक्के गुण मिळवून शाळेतून संयुक्तरीत्या प्रथम येण्याचा मान पटकावला आहे.अग्रवाल समाजातील प्रतिष्ठित व्यापारी व सक्रिय सामाजिक कार्यकर्ते रितेश चौधरी यांचे मोठे भाऊ महेश चौधरी यांची मुलगी माही मोठी मुलगी आहे.

श्री. ब्रजलाल बियाणी विद्यानिकेतन संचालित कोठारी कॉन्व्हेंटची माही महेश चौधरी या विद्यार्थिनीने तीन विषयांमध्ये १०० पैकी १०० गुण मिळवून शाळेच्या गुणवत्ता यादीत संयुक्तपणे पहिला क्रमांक पटकावला असून इंग्रजीत १०० पैकी ९० गुण तर संस्कृतमध्ये १०० पैकी १००, मराठीत १०० पैकी ९४, गणितात १०० पैकी १०० आणि विज्ञान विषयात १०० पैकी ९९ तर समाजशास्त्रात १०० पैकी १०० गुण प्राप्त केले आहे. विशेष म्हणजे कोठारी कॉन्हेंटच्या दहावीची परीक्षा दिलेल्या ८९ विद्यार्थ्यांपैकी माही चौधरीने हिने १०० टक्के गुण प्राप्त केले आहेत.

लहानपणापासून तल्लख स्मरणशक्ती आणि नियमितपणे अभ्यास करण्याचा सराव आणि या सोबतच आई आणि वर्गशिक्षक यांचें नियमित मार्गदर्शनाखाली आपण हे यश मिळवले आहे. आपल्याला इंजिनिअर म्हणून भविष्य घडवायचे असून यासाठी जेईई या प्रवेश पुर्व परिक्षाचा अभ्यास करीत आहेत. यामध्ये आपण निश्चितच यशस्वी होणार आहे.असे माही चौधरीने सांगितले. तीच्या या यशाबद्दल शैलेश उपाख्य बंटी कागलीवाल, राजेश चौधरी, राहुल चौधरी, भूषण चौधरी व उमेश चौधरी यांनी अभिनंदन केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!