Saturday, December 21, 2024
Homeआंतरराष्ट्रीयउष्माघाताचा धोका वाढला ! अकोला जिल्ह्यात कलम 144 लागू : अकोलेकरानो सजग...

उष्माघाताचा धोका वाढला ! अकोला जिल्ह्यात कलम 144 लागू : अकोलेकरानो सजग रहा

अकोला दिव्य न्युज ब्युरो : सद्यस्थितीत अकोला जिल्हयामध्ये तापमान 44° ते 46° अंश सेल्सिअस असुन तापमानाचा पारा चढता असल्यामुळे उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. प्रादेशिक मौसम विभाग नागपुरकडून 25 ते 31 मे 2024 पर्यंत उष्मालाटेची शक्यता वर्तविली आहे.त्यामुळे उष्माघाताचा धोका निर्माण झाला असुन उष्माघातामुळे सर्वसामान्य नागरीकांना, कामगारांना तसेच विदयार्थ्यांना त्रास होऊ नये या करीता कामगारांना आवश्यक सेवा पुरविणे, खाजगी क्लासेसच्या वेळेमध्ये बदल करणे, तसेच इतर उपाययोजना प्रभावीपणे राबविणे आवश्यक आहे.

अकोला जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी अजित कुंभार यांनी त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन अकोला जिल्हयात आज शनिवार 25 मे 2024 रोजी दुपारी 4 वाजता पासुन ते दि. 31 मे 2024 रोजीचे रात्री 12 वाजतापर्यत फौजदारी प्रक्रीया संहीता, 1973 चे कलम 144 चे आदेश लागू करण्यात येत असून खालीलप्रमाणे आदेशित करण्यात आले आहे.

  1. उक्त नमुद कालावधीमध्ये अंगमेहनत करणारे कामगार तसेच औदयागिक क्षेत्रामध्ये काम करणारे कामगार यांचेकडुन उन्हात काम करुन घेता येणार नाही.
  2. ज्या कामाच्या ठिकणी अत्यावश्यक काम असेल अशा ठिकाणी उष्माघातापासूण संरक्षणासाठी पुरेसे शेड तयार करणे, पंखे कुलर किंवा तत्सम साधनांची व्यवस्था करणे तसेच पिण्याचे पुरेसे पाणी व प्रथमोपचार पेटी ठेवणे याची जबाबदारी संबधित आस्थापना मालक यांची राहील. याबाबत तक्रार असल्यास ती संबधित ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगरपरीषद, पोलिस विभाग, कामगार कल्याण विभाग यांचेकडे करता येईल.
  3. खाजगी कोचिंग क्लासेसच्या संचालकांनी सकाळी 10 वाजेपर्यंत व सायंकाळी 5 वाजेनंतर कोचिंग सेंटर चालवावेत तद्नंतर सकाळी 10 ते 5 या वेळेत कोचिंग क्लासेस सुरु ठेवायचे असल्यास कोचिंग सेंटर मध्ये पुरेसे पंखे, कुलर तत्सम साधनांची व्यवस्था करण्याची जबाबदारी खाजगी कोचिंग क्लासेसच्या संचालकांची राहील. सदरचा आदेश हा सर्व संबधितावर वैयक्तीकरीत्या नोटीस बजावणी करणेसाठी पुरेसा कालावधी नसल्याने फौजदारी प्रक्रीया संहीता, 1973 चे कलम 144(2) नुसार एकतर्फी काढण्यात येत आहे.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!