अकोला दिव्य न्युज ब्युरो : भारत आणि ऑस्ट्रेलिया २००३ मध्ये विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहोचले होते, त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर मात केली होती. आता तब्बल २० वर्षानी आयसीसी एकदिवसीय विश्वचषक अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया आमने सामने आहेत. अंतिम सामना जिंकून भारतीय संघाला तिसऱ्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याची संधी आहे अशा ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार राहण्यासाठी १९८३ मध्ये विश्वचषक जिंकणा-या भारतीय संघाला आमंत्रित केले असते तर “सोने पर सुहागा” झाले असते.पण सब कुछ मोदी या कुत्सित भावनेने ग्रासल्याने संपूर्ण संघाला सोडा, १९८३ च्या विश्व विजेता संघाचे नेतृत्व करणारे कपिल देव यांनाही आमंत्रित केले नाही. ही घाणेरड्या राजकरणाची सुरुवात झाली आहे.
भारताला पहिला विश्वचषक जिंकूवून देणारे कर्णधार कपिल देव अनेकांसाठी प्रेरणा आहेत. १९८३ मध्ये त्यांच्या नेतृत्वात भारतीय संघाने विश्वचषक उंचावला होता. यंदाच्या वन डे विश्वचषकात भारताने फायनलमध्ये मजल मारताच अनेक जाणकारांसह माजी खेळाडू यजमान संघ विजयी होईल असा विश्वास व्यक्त करत आहे. आज अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात किताबासाठी लढत होत आहे. अशातच भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी एक मोठे विधान केले. २०२३ च्या फायनलसाठी मला आमंत्रित केले नसल्याचा दावा केला आहे.
कपिल देव यांची खदखद
एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना कपिल देव यांनी खदखद व्यक्त केली, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांनी सांगितले की, तुम्ही मला बोलावले आणि मी इथे आलो. त्यांनी (बीसीसीआय) मला बोलावलेच नाही. खरं तर १९८३ चा संपूर्ण संघ तिथे बोलवायला हवा होता असे मला वाटते. पण, आता सर्वकाही वेगळे असून काही लोक मागील गोष्टी विसरत आहेत.
कपिल देव यांच्या नेतृत्वात टीम इंडियाने १९८३ मध्ये बलाढ्य वेस्ट इंडिजला चीतपट करून विश्वचषक उंचावला होता. कपिल देव अहमदाबाद येथे होत असलेल्या फायलचे साक्षीदार होत नसले तरी विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळींची उपस्थिती लक्षणीय आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान रिचर्ड मार्ल्स यांच्यासह फायनलचे साक्षीदार झाले.